भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलिसांत तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 03:03 PM2018-08-29T15:03:10+5:302018-08-29T15:08:49+5:30

पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे नाव अचानक काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़. 

Bhausaheb Rangari Ganpati Trust registered a complaint in police | भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलिसांत तक्रार दाखल 

भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलिसांत तक्रार दाखल 

Next
ठळक मुद्देमहापालिकेने अचानक काढून टाकले नाव : सायबर सेलकडे तक्रार

पुणे : भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे अचानक नाव काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़. 
भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे कायदा सल्लागार अ‍ॅड. मिलिंद  पवार  व भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने सचिव राजेंद्र गुप्ता, विश्वस्त सुरज रेणुसे, बाळासाहेब निकम यांनी माहिती दिली़. 
  ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. तसेच स्वातंत्र्याचा लढा त्यावेळी जोरात चालू होता. लोकांनी एकत्र येवून काहीतरी करणे गरजेचे झाले होते व तत्कालीन क्रांतिकारकांची बैठक भाऊसाहेब रंगारी यांच्या बुधवार पेठ सध्याचे रंगारी भवन येथे पार पडली होती व घरातला गणपती सार्वजनिकरित्या रस्त्यावर बसवून ऊत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरले व त्यानुसार सर्वात प्रथम १८९२ मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणपती सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना करत गणेशोत्सव साजरा केला.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९४ मध्ये प्रथम पुणे येथे विंचूरकर वाड्यात गणपती बसविला. व त्यानंतर गणपती ऊत्सवाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार केला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी व टिळक दोघांचा उद्देश ब्रिटिश राजवटीविरुद्ध व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा उभा करायचा हाच होता. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक आहेत. त्यांचे श्रेय त्यांना मरणोत्तर मिळावे व खरा इतिहास बाहेर यावा यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट काही वर्षं प्रयत्न करत आहे.
         भाऊसाहेब रंगारी यांनी त्या काळात इको फ्रेंडली मूर्ती बनविली तीच आजही बसविली जाते. फक्त आणि फक्त क्रांतीच्या संकल्पनेतून उभारलेल्या गणेशोत्सवाचे प्रतिक म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब यांनी साकारलेली दृष्ट प्रवृत्तीशी दोन हात करणारी श्रींची ईको फ्रेंडली लढाऊ काव्यातील मूर्ती. आशीर्वाद देण्यासाठीचा हात ही संकल्पनाच यावेळी राबवली गेली नाही, कारण जे काय ते लढूनच घ्यायचे आहे. आणि १९ व्या शतकाच्या शेवटी ज्या संकल्पनेतून गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी आणि या त्यांच्या सोबत्यांनी अवलंबला त्याच शिकवणीतून आजच्या काळातही उभारलेल्या संविधानिक लढ्याला यश आले म्हणावे लागेल. 
         पुणे महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची नोंद केली असून गणेशोत्सवाचे साल १८९२ च नमूद केले आहे़. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे पुणे महानगरपालिकेचे महापालिकेत झालेल्या बैठकीत आभार मानले व लगेचच त्याच रात्री बाराच्या सुमारास महानगरपालिकेच्या वेबसाईट वरून १८९२ सालात भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली असा मजकूर होता. हा मजकूर अचानक काढून टाकण्यात आला.
          महानगरपालिकेच्या या कृत्याविषयी व इतिहासाची मोडतोड केली, खोटा इतिहास पसरविला, खरा इतिहास लपवून ठेवून समाजाची दिशाभूल केली. म्हणून पोलीस आयुक्त पुणे, पोलीस निरीक्षक सायबर सेल, महापालिका आयुक्त, महापालिका सायबर सेल प्रमुख व महापौर यांचेकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे असे त्यांनी सांगितले़. 

Web Title: Bhausaheb Rangari Ganpati Trust registered a complaint in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.