गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये

By अजित घस्ते | Published: April 28, 2023 02:03 PM2023-04-28T14:03:38+5:302023-04-28T14:03:50+5:30

मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने मार्केट यार्ड बाजारात जांभळाला मागणी वाढली

Bhav eaten by the purples in Gujarat 200 per kg | गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये

गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये

googlenewsNext

पुणे: मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने मार्केट यार्ड बाजारात जांभळाला मागणी वाढली आहे. बाजारात जांभळाचा हंगाम सुरू झाल्याने गावरान जांभळाबरोबरच गुजरातच्या लांबलचक काळ्याभोर जांभळांना मागणी वाढत आहे. या जांभळाला घाऊक बाजारात प्रतवारीनुसार किलोला १२० ते २०० रुपये भाव मिळत आहे, तर किरकोळ बाजारात २५० रुपये किलो भाव मिळत आहे.

गुजरातच्या सौराष्ट्र भागातून जांभळांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातमधील जांभळांची आवक वाढली असून सध्या दीड ते २ टन मालाची आवक होत आहे. जांभळांचा हंगाम दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होतो. तो जुलैपर्यंत सुरू असतो. कर्नाटकातील जांभळांची आवकही तुरळक प्रमाणावर होत असल्याचे मार्केट यार्डातील जांभूळ व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
जांभळांची गुजरात, कर्नाटक, तळकोकणातील सावंतवाडी भागातून मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यासोबतच पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील गावरान जांभळांचीही आवक सुरू आहे. जांभळांपासून सरबतही तयार केले जाते. पर्यटनस्थळांवरून जांभळांना चांगली मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जांभळांची लागवड चांगली झाल्याने मागणीही वाढली आहे.

''गुजरातमधील जांभळे आकाराने मोठी आणि आकर्षक असतात तसेच चवीला गोड असतात. गावरान जांभळे आकाराने लहान आणि खायला कमी गोड असतात. गुजरातसोबतच कर्नाटकातील जांभळांची आवक येत्या काही दिवसांत सुरू होईल. एक किलो जांभळाला प्रतवारीनुसार १२० ते २५० रुपयांचा भाव आहे. - पांडुरंग सुपेकर व्यापारी''

Web Title: Bhav eaten by the purples in Gujarat 200 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.