भलवडी संस्थेची निवडणूक बिनविरोध
By admin | Published: December 30, 2014 10:54 PM2014-12-30T22:54:57+5:302014-12-30T22:54:57+5:30
भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत माजी सरपंच अतुल देशमुख यांच्या समर्थकांनी बाजी मारली.
पाईट : भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत माजी सरपंच अतुल देशमुख यांच्या समर्थकांनी बाजी मारली.
महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१३ नुसार खेड तालुक्यातील सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. तालुक्यातील निवडणूक लागलेल्या पहिल्या विविध सहकारी संस्थेची निवडणूक पार पडली . या निवडणुकीत राजगुरुनगरचे माजी सरपंच अतुल देशमुख यांचे सदस्य या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याने या सोसायटीवर अतुल देशमुख यांनी वर्चस्व राखले आहे.
भलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण जागेकरिता ८ जागांसाठी १४ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. यामध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी माघार घेतल्यावर ८ जागेसाठी ८ उमेदवार राहिले, तर महिलांच्या दोन
जागेकरिता ३ उमेदवार होते. त्यापैकी बबाबाई गिरहे यांनी माघार घेतल्याने २ जागा बिनविरोध झाल्या, तर इतर मागासवर्ग व अनुसूचित जाती या वर्गासाठी एक एकच अर्ज
आल्याने त्या जागाही बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भुजबळ यांनी
जाहीर केले.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विराम, भलवडी औढे ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष भुजबळ यांनी काम पाहिले. या कामी सहायक म्हणून संस्थेचे सचिव अशोक टाव्हारे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
४सर्वसाधारण : जागा ८ : लक्ष्मण सावंत, विनोद शिंदे, तुकाराम सावंत, लक्ष्मण
सावंत, भागुजी सावंत, सोपान गिरहे, आंकुश गिरहे,
भागुजी गिरहे
४इतर मागास राखीव : जागा १ : ज्ञानेश्वर सावंत
४अनु. जाती राखीव : जागा १ : चिमा रोकडे
४महिला राखीव : जागा २ : अलका गिरहे, सुमनबाई गिरहे