पुण्यातला भिडेपूल पाण्याखाली ; खडकवासला 100 टक्के भरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 04:21 PM2019-07-30T16:21:07+5:302019-07-30T16:23:22+5:30

खडकवासला धरणात झालेल्या दमदार पावसामुळे मुठा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले. त्यामुळे बाबा भिडेपूल पाण्याखाली गेला.

bhide bridge under water ; khadakwasla dam fulled | पुण्यातला भिडेपूल पाण्याखाली ; खडकवासला 100 टक्के भरलं

पुण्यातला भिडेपूल पाण्याखाली ; खडकवासला 100 टक्के भरलं

googlenewsNext

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला बाबा भिडेपूल आज सकाळी पाण्याखाली गेला. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने आज सकाळी 10 वाजता मुठा नदीपात्रात 13981 क्सुसेस इतक्या वेगाने पाणी साेडण्यात आले. त्यामुळे मुठा नदी पात्र साेडून वाहू लागली. सकाळी 11 च्या सुमारास भिडेपूल पाण्याखाली गेला. 

जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली. परंतु जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे महिन्याभराचा बॅकलाॅक पावसाने भरुन काढला. खडकावासला धरणक्षेत्रात जाेरदार पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे मुठा नदीपात्रात सकाळी 10 वाजता पाणी साेडण्यात आले. पाणी साेडण्यात येत असल्याने नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला हाेता. मुठा नदीपात्रात साेडण्यात आलेल्या पावसामुळे भिडेपूल पाण्याखाली गेला. पाेलिसांकडून भिडे पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली. तसेच पाेलिसांच्या माध्यमातून भिडे पूलाकडे नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात येत हाेता. नदी किनारी पात्रात ठेवण्यात आलेल्या स्क्रॅप वाहने या पुराच्या पाण्यात बुडाली. दुपारनंतर पाणी काहीसे ओसरले. 

दरम्यान गेल्या 24 तासात खडकवासला धरणात 33 मिलीमीटर, पानशेत धरणात 147,  वरसगाव धरणात 136, टेमघर धरणात 142 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. सध्या खडकवासला 100 टक्के, पानशेत 83.51 टक्के, वरसगाव 68.35 टक्के तर टेमघर 60.64 टक्के भरले आहे. 

Web Title: bhide bridge under water ; khadakwasla dam fulled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.