भिडे गुरुजींनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले पण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 08:20 PM2019-06-26T20:20:54+5:302019-06-26T20:21:48+5:30

पालखीच्या मार्गात कोणत्याही वेगळ्या संघटनेला घुसण्यास मज्जाव करावा असे पत्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी समितीने पुणे पोलिसांना दिले होते.

Bhide Guruji devote of Sant Dnyaneshwar Maharaj's palkhi but ..... | भिडे गुरुजींनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले पण.....

भिडे गुरुजींनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले पण.....

Next
ठळक मुद्देसंत तुकाराम महाराज पालखीचा रथ भिडे यांच्या दिशेने वळवून त्यांना सारथ्याची दिली संधी

पुणे : मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले. मात्र संत तुकाराम महाराज पालखी रथाप्रमाणे या रथाचे सारथ्य करण्याची संधी त्यांना देण्यात आली नाही. पोलिसांच्या गराड्यात काही क्षणात दर्शन घेऊन त्यांना बाजूला करण्यात आले आणि क्षणार्धात पालखी पूढे रवाना झाली.
पालखीच्या मार्गात कोणत्याही वेगळ्या संघटनेला घुसण्यास मज्जाव करावा असे पत्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी समितीने पुणेपोलिसांना दिले होते. त्यानुसार भिडे व त्यांच्या समर्थक धारकऱ्यांना पोलिसांनी अडवून धरले होते.
मात्र संत तुकाराम महाराज पालखीचा रथ भिडे यांच्या दिशेने वळवून त्यांना सारथ्याची संधी देण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाने आपला मार्ग न बदलता भिडे यांना रस्त्याच्या मध्यभागी येण्यास भाग पाडले. त्यानंतर परंपरेत कोणताही बदल न करता त्यांनी भिडे यांना दर्शनासाठी अवधी देत क्षणार्धात पालखी पुढे रवाना केली.

Web Title: Bhide Guruji devote of Sant Dnyaneshwar Maharaj's palkhi but .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.