भिगवनला भैरवनाथ व श्रीनाथ पॅनलची सरळ लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:14+5:302020-12-27T04:08:14+5:30

भिगवण गावावर पंचवीस वर्षापासून दिवंगत नेते रमेश जाधव यांची एक हाती सत्ता होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्व विरोधकांना एकत्र ...

Bhigwan to Bhairavnath and Srinath panel straight fight | भिगवनला भैरवनाथ व श्रीनाथ पॅनलची सरळ लढत

भिगवनला भैरवनाथ व श्रीनाथ पॅनलची सरळ लढत

googlenewsNext

भिगवण गावावर पंचवीस वर्षापासून दिवंगत नेते रमेश जाधव यांची एक हाती सत्ता होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्व विरोधकांना एकत्र करीत '''' ''''एक बदल घडवा सर्व बदल घडतील'''' अशी हाक देत सत्ता काबीज केली होती. सत्ता मिळाल्यानंतर सर्व सदस्यांना सरपंच उपसरपंच पद मिळावे यासाठी राष्ट्रवादीने पद बदलीचा कार्यक्रम राबवला. मात्र विरोधकांनी या पद बदलाला संगीत खुर्ची उपमा देत टीकेची झोड उठवली. विकास कामात सदस्य मंडळी करीत असलेल्या ठेकेदारी बाबत टार्गेट केले. या दोन्ही पक्ष करीत असलेल्या आरोप-प्रत्यारोप यांच्यात दिवसेंदिवस रंगत वाढत असून निवडणुकीच्या दिवसापर्यंत आणखीन काय आरोप केले जातात याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागून आहे. सत्ताधारी पक्ष हा आपण केलेल्या विकास कामावर ठाम असून मतदार हा ५ वर्षात झालेल्या विकासकामांना नक्की मत देईल, भाजपने सर्वपक्षीय पॅनल असल्याचा केवळ आव आणत असल्याचे सत्ताधारी पॅनल प्रमुख अँड .महेश देवकाते यांनी म्हटले आहे.

श्रीनाथ ग्रामविकास पॅनलचे पराग जाधव भिगवन गावातील ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपला पॅनल निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगत आहेत.

Web Title: Bhigwan to Bhairavnath and Srinath panel straight fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.