भिगवणला तासाभरात ७१ मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:30+5:302021-06-04T04:09:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : परिसरात झालेल्या बुधवारी (दि. २) ढगफुटीसदृश पावसाने अनेक ठिकाणी पाणी वाहत घरात घुसल्याने नागरिकांचे ...

Bhigwan receives 71 mm of rainfall in an hour | भिगवणला तासाभरात ७१ मिमी पावसाची नोंद

भिगवणला तासाभरात ७१ मिमी पावसाची नोंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

भिगवण : परिसरात झालेल्या बुधवारी (दि. २) ढगफुटीसदृश पावसाने अनेक ठिकाणी पाणी वाहत घरात घुसल्याने नागरिकांचे नुकसान झाले. येथील पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यांना पूर आला. यामुळे अनेक दुचाकी वाहने ही वाहून गेली. जवळपास तासाभरात ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देविदास फलफले यांनी दिली.

भिगवण परिसरात झालेल्या या माॅन्सूनपूर्व पावसाने भिगवण ट्रामा सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच थोरातनगर येथील शासकीय रो हाउसमध्ये पाणी वेगाने घुसले. या पाण्याला असणाऱ्या वेगामुळे कोविड सेंटर आवारात लावलेल्या काही दुचाकी वाहून गेल्या. तसेच इमारतीची संरक्षक भिंत कारवर पडल्यामुळे नुकसान झाले.

पुणे-सोलापूर महामार्गावर पावसाचे पाणी वाहून नेणारी सक्षम व्यवस्था नसल्यामुळे पुणे आणि सोलापूर बाजूचे जवळपास १ किलोमीटर अंतरावरील पाणी बस स्थानक पुलाखालून वाहत होते. या पाण्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ट्राॅमा केअर सेंटर पाठीमागील डॉक्टरांच्या निवासस्थानासमोरून पाणी वेगात वाहत रो हाउस परिसरात घुसले. काही रो हाउसमध्ये पश्चिमेच्या बाजूने घुसलेले पाणी पूर्वेला धबधबे वाहत असतात त्याप्रमाणे वाहत होते. यामुळे अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

चौकट

पावसाचे पाणी जाण्यासाठी सक्षम व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा नागरिकांचे नुकसान होत आहे. पुणे-सोलापूर महामार्गाची निर्मिती करताना पश्चिम बाजूला असणाऱ्या टेकडीवरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी १ किलोमीटर परिसरात कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येक वेळी या ठिकाणी ढगफुटी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.

Web Title: Bhigwan receives 71 mm of rainfall in an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.