दौंडला भीम अनुयायांनी केला बाबासाहेबांचा जयघोष
By admin | Published: April 15, 2015 11:13 PM2015-04-15T23:13:03+5:302015-04-15T23:13:03+5:30
दौंड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात आला. या वेळी भीम अनुयायांनी एकच जल्लोष केला.
दौंड : दौंड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात आला. या वेळी भीम अनुयायांनी एकच जल्लोष केला.
आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया, तहसीलदार उत्तम दिघे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे, मुख्याधिकारी शिवाजी कापरे, रवी कांबळे, प्रकाश भालेराव, रोहित कांबळे, विकास कदम, नागसेन धेंडे, प्रा. भिमराव मोरे, भास्करराव सोनवणे, अश्विन वाघमारे, नागेश साळवे, राजेश मंथने, आनंद बगाडे, प्रमोद राणेरजपुत, नरेश डाळिंबे, सतीश थोरात, मच्छिंद्र डेंगळे, श्रीकांत साळवे, राजेंद्र खटी, बादशहा शेख, अॅड. अजित बलदोटा, फिलिप धुमाळ, गणेश पवार, गणेश दळवी, संजय कांबळे, विनायक माने, भारत सोनवणे, उपस्थित होते. दरम्यान, शहरातील कानाकोपऱ्यातून हाती निळे झेंडे घेऊन डॉ. आंबेडकरांचा जयघोष करीत शहरातून सवाद्य मिरवणूक शांततेत काढल्या. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
नेत्रदानाचा संकल्प
गोपाळवाडी रोड परिसरात संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राहुल कुल, प्रेमसुख कटारिया, योगेश कटारिया, बबन सरनोत, शितल मोरे, स्वाती कुलथे, सरस्वती काळे, भारत सरोदे, आण्णा जगताप, बंडू जगताप, नरेश वाल्मिकी, राजेंद्र खटी, अनिल सोनवणे, राजेश मंथने, डॉ. मुकुंद भोर, डॉ. सुषमा भोर यांच्या उपस्थित झाले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. भिमराव मोरे, बी.वाय जगताप, प्रवीण मोरे, संदीप जगताप, प्रा.गिरीष सुरवाडे, दिलीप सुरवसे आदींनी केले होते. या महोत्सवात शाकीर शेख प्रस्तुत भीमगीतांचा कार्यक्रम झाला. नगरसेविका शितल मोरे यांनी एक गरजू विधवा महिलेला शिलाई मशीन दिली. डॉ. प्रेमकुमार भट्टड व डॉ. मधुकर मोकाशी यांच्या उपस्थितीत प्रा. भिमराव मोरे, बाबासाहेब कोरी, विनोद सावंत, संजय गुंजकर, सुनील खरे, राजकमल वालिया, महेंद्र आढाव, विलास राजवंत यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म भरुन दिला. या कार्यक्रमासाठी के. के. खंडीझोड, के. के. कांबळे, सुर्यकांत जानराव, एस. बी. गायकवाड, डॉ.किरण जाधव यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप व आभार प्रवीण मोरे यांनी मानले.
रेल्वे परिसरात राष्ट्रपुरुषांना मानवंदना
रेल्वे परिसरातील सी. एन. डब्ल्यु. आर. ओ. एच. कारखाना परिसरात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कॉ. अनिल धेंडे यांच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. युनुस अन्सार, ए. एस. जगताप, बी. आर. मोहिते, डी. आर. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन ए. आर. गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास गायकवाड, दीपक लंकेश्वर, करण डोंगडे, अनुप काळे, प्रभाकर पोतेकर यांनी केले. दौंड नगर परिषदेत आंबेडकरांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार समर्पित केला. यावेळी नगरसेवक, नगरसेविका आणि कर्मचारी उपस्थित होते.