भीमा -कृष्णा खोऱ्यातील पाणीसाठा पोहचला 80 टक्क्यांवर; पंधरा दिवसांत 157 टीएमसी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:15 PM2020-08-17T13:15:04+5:302020-08-17T13:15:41+5:30
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सर्व खोऱ्यांतील धरण साठ्यात समाधानकारक वाढ
पुणे : भीमा- कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे धरणसाठ्यात पंधरा दिवसांत तब्बल 157 टीएमसीने वाढ झाली. आज अखेर दोन्ही खोऱ्यातील धरणसाठा 329.38 टीएमसी ( 77.07) टक्के झाला आहे. यामध्ये केवळ कुकडी खोरे अद्यापही पन्नास टक्क्यांच्या खालीच आहे. तर सर्व खोऱ्यांतील धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
ऑगस्ट महिना उजाडला तेव्हा भीमा-कृष्णा खो-यातील अनेक धरणांतील पाण्याने तळ गाठला होता. यामुळे भविष्यात राज्यात गंभीर पाणी टंचाई निर्माण होते की काय अशी परिस्थिती होती. अखेर ऑगस्ट महिन्यांपासून पावसाला थोडी-थोडी सुरुवात झाली. यात गेल्या आठ-दहा दिवसांत तर सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे. यामुळेच पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. आज अखेर मुठा खो-यात 82 टक्के, नीरा खोऱ्यात 83 टक्के, कुकडी केवळ 46 टक्के तर भीमा खोऱ्यात 67 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. कृष्णा खोऱ्यात सर्वाधिक म्हणजे 84 टक्के पाणी साठले आहे.
----
- मुठा खोऱ्यात 23.98 टीएमसी (82.24 टक्के) पाणी साठा
- नीरा खोऱ्यात 42.70 टीएमसी (83.34 टक्के) पाणी साठा
- कुकडी खोऱ्यात केवळ 16.85 टीएमसी (46.68 टक्के) पाणी साठा
धरणांतील पाणी साठ्याची माहिती
धरण क्षमता (टीएमसी) आजचा साठा टक्केवारी
टेमघर 3.71 2.33 62.75
वरसगाव 12.82 9.98 77.78
पानशेत 10.65 9.87 92.19
खडकवासला 1.97 1.86 94.08
पवना 8.51 5.77 67.81
मुळशी 18.47 16.84 91.17
चासकमान 7.58 4.40 58.07
भामाआसखेड 7.67 5.26 68.58
गुजवणी 3.69 3.51 95.21
भाटघर 23.50 21.7 89.63
निरा देवघर 11.73 9.21 78.53
वीर 9.41 8.90 94.63
माणिकडोह 10.17 2.16 21.22
येडगाव 1.94 1.13 58.13
डिंभे 12.49 8.45 87.67
उजनी 53.57 16.15 30.15
कोयना 100.14 23.74 42.44
वारणा 27.55 24.13 87.59
राधानगरी 7.77 7.39 95.10
दूधगंगा 23.98 21.98 91.64