भीमा-नीरा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यात क्रेन तुटून अपघात, नऊ कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 07:24 PM2017-11-20T19:24:35+5:302017-11-20T23:46:03+5:30
इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) अकोले येथे निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बोगद्यात क्रेन तुटून झालेल्या अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाला.
अकोले : इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) अकोले येथे निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बोगद्यात क्रेन तुटून झालेल्या अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाला.
निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत तावशी ते डाळज बोगद्याचे काम सुरू आहे. आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास बोगद्यातील काम उरकून ९ परप्रांतीय कामगार क्रेनमध्ये वर येत होते. यावेळी क्रेन निम्म्यापर्यंत आल्यावर वायररोप तुटला. त्यामुळे हे कामगार २०० फूट खोल बोगद्यात कोसळले. त्यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. उत्तरप्रदेश, ओडिसा, आंधप्रदेश येथील हे कामगार आहेत. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५ परप्रांतीय कामगारांचे मृतदेह वर काढण्यात यश आले. आणखी चार कामगारांचे मृतदेह वर काढण्यासाठी प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती समजताच अकोले परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकोले परिसरातील या प्रकल्पाच्या शाफ्ट नं. ५ येथे ही घटना घडली.