राजकारण बाजूला ठेवून भीमा पाटसला मदत

By admin | Published: October 13, 2014 11:19 PM2014-10-13T23:19:22+5:302014-10-13T23:19:22+5:30

भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याला आमदार रमेश थोरात यांनी जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून मदत केली. मात्र, तरीही हा कारखाना व्यवस्थित चालविता आला नाही,

Bhima Patas help with politics aside | राजकारण बाजूला ठेवून भीमा पाटसला मदत

राजकारण बाजूला ठेवून भीमा पाटसला मदत

Next
पाटस : भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याला आमदार रमेश थोरात यांनी जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून मदत केली. मात्र, तरीही हा कारखाना व्यवस्थित चालविता आला नाही,  ही दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.
पाटस येथे रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी तालुक्यातून मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 
पवार म्हणाले, ‘‘सुभाष कुल आणि रंजना कुल यांना प्रत्येकी दोन वेळा संधी दिली. त्यानंतर राहुल कुल यांना संधी दिली. मात्र, तरीही त्यांचा पराभव झाला. याला जबाबदार तो स्वत:च आहे. कुल कुटुंबीयांना 5 वेळा संधी देऊन विविध पदेदेखील दिली आहेत. तरीही ते आमच्यावर ते टीका करत आहेत. कारखान्याच्या सभासदांना भाव नाही, कामगारांचे पगार नाही, ही बाब गंभीर आहे. कारखान्याला वेळोवेळी मदत केली आहे. तसेच पुणो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून रमेश थोरात यांना कारखान्याला मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. थोरातांनी देखील राजकारण बाजूला ठेवून मदत केली आहे, तरीदेखील कारखान्याची अवस्था सध्या हलाखीची आहे. भीमा पाटसला संकटकाळी मदत केली आहे की नाही हे देखील सांगावे.’’
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘‘धनगर समाजाच्या समृद्धीसाठी मी सर्वात प्रथम पंतप्रधानांकडे पत्र दिले आहे. कारण आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नसून तो केंद्राचा आहे. केंद्रात यासाठी सुरू  केलेला पाठपुरावा सातत्याने पुढे सुरु राहील, असे पवार म्हणाले. पवार म्हणाले, ‘‘रमेश थोरात यांनी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर विकास केला आहे. भविष्यात विकासात्मक दृष्टिकोन असलेल्या रमेश थोरात यांना मोठय़ा मताधिक्याने विजयी करावे.’’ या वेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘रमेश थोरात यांनी राष्ट्रवादीला चांगल्या वाईट काळात साथ दिली.  राज्यात मोठय़ा प्रमाणावर विकासासाठी निधी आणणारे म्हणून थोरात यांची ओळख आहे.’’ रमेश थोरात म्हणाले, ‘‘तालुक्यात 442 कोटी रुपयांची  विकासकामे झाली आहेत.’’ या वेळी माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील, देवराव पाटील, बबन लव्हे, माऊली शिंदे, वीरधवल जगदाळे, सत्त्वशील शितोळे, अप्पासाहेब पवार, महेश भागवत, अनंत थोरात, अॅड. अजित बलदोटा, वैशाली नागवडे, नंदू पवार, गुरुमुख नारंग, योगेंद्र शितोळे, प्रशांत शितोळे, धनंजय भागवत, रामदास दिवेकर, मंदाकिनी चव्हाण, नानासाहेब फडके, नागसेन धेंडे, आबा वाघमारे, सतीश थोरात, मंगेश दोशी, उत्तम 
आटोळे, रामभाऊ टुले, अशोक खळदकर, संतोष वरघडे यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  (वार्ताहर)
 
4सत्त्वशील शितोळे, आनंद थोरात, महेश भागवत या भीमा-पाटसच्या तीन संचालकांनी राजीनामे देऊन आपला खरा स्वाभिमान जपला आहे, असाच स्वाभिमान कारखान्यात इतरांनी जोपासावा. तसेच राजकारणात विरोध आणि टीका असावी, त्याला मर्यादा असते. मात्र, माङयावर टीका करणो कितपत योग्य आहे, याचा विचार करावा, असे शरद पवार म्हणाले. 
 
4तालुक्यात माङया आणि रमेश थोरात यांच्या माध्यमातून मोठा विकास झाला आहे. दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीचे कामकाज सुरु आहे. पुणो-दौंड विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून दौंड येथे 100 कोटींपेक्षा जास्त असलेला विद्युत लोकोशेडचे काम सुरु आहे. तेव्हा विरोधकांनी डोळ्यांवरची पट्टी सोडून हा विकास पाहावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

 

Web Title: Bhima Patas help with politics aside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.