Bhima Patas : शेतकऱ्यांना दिलासा! चालू गळीत हंगामात भीमा पाटसचे धुराडे पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 07:06 PM2022-10-20T19:06:09+5:302022-10-20T19:09:07+5:30

या हंगामात सुरू होणार असल्याने शेतकरी व कामगार यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण...

Bhima Patas will burn during the current fall season farmer in pune | Bhima Patas : शेतकऱ्यांना दिलासा! चालू गळीत हंगामात भीमा पाटसचे धुराडे पेटणार

Bhima Patas : शेतकऱ्यांना दिलासा! चालू गळीत हंगामात भीमा पाटसचे धुराडे पेटणार

googlenewsNext

पाटस/केडगाव (पुणे) : राज्य सहकारी बँकेने भीमा पाटस कारखाना चालविण्यासाठी देण्याचा करार झाला आहे. या निर्णयामुळे २ वर्षानंतर भीमा पाटसचे धुराडे आता पेटणार आहे. गुरुवारी सकाळीच साई प्रिया शुगर (निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी पाटस येथील कारखान्यास भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली. भीमा पाटस साखर कारखाना भाडेतत्त्वावर साई प्रिया शुगर(निराणी शुगर्स) या कंपनीला चालवायला दिला असून कारखाना या हंगामात सुरू होणार असल्याने शेतकरी व कामगार यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, नामदेव बारवकर, पंढरीनाथ पासलकर, आबासाहेब खळदकर, तुकाराम ताकवणे, विकास शेलार यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते.

साई प्रिया शुगर(निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी पाहणी करताना कारखान्याचे कामकाज तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून त्या दृष्टीने भीमा पाटसच्या कामगारांना उद्याच कामावर येण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

राहुल कुल म्हणाले की, राज्य सहकारी बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार साई प्रिया शुगरला (निराणी शुगर) निविदा मिळाली होती. कारखाना हा सहकारी तत्त्वावरच सुरू राहणार आहे. साई प्रिया शुगर (निराणी शुगर) यांना कारखान्यासाठी पूर्ण सहकार्य करणार आहे. यावेळी पाहणी करताना कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सत्वशील शितोळे यांनीही कारखाना लवकर सुरू करा व त्यासाठी आमच्याकडून जे सहकार्य हवे असल्यास ते आम्ही करु असे आश्वासन त्यांनी दिले.

बुधवारी सायंकाळी भीमा पाटसच्या कार्यस्थळावर दोन वर्षांपूर्वी सतत वाजणाऱ्या कारखान्याच्या भोंग्याचा आवाज आला. आणि सभासदांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या कारखान्याला पुनरूज्जीवन आणण्यासाठी आमदार कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून शेकडो दिल्ली व मुंबईचे दौरे केले. आज त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याची भावना सभासदांनी बोलून दाखवली.

Web Title: Bhima Patas will burn during the current fall season farmer in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.