भीमा-पाटस प्रतिदिन ६५०० टन ऊसगाळप करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:35 AM2018-10-29T02:35:38+5:302018-10-29T02:35:52+5:30
भीमा पाटस कारखाना प्रतिदिन ६५00 टन ऊस गाळप करणार असल्याचे असे प्रतिपादन दौंडचे आमदार तथा भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले.
केडगाव : भीमा पाटस कारखाना प्रतिदिन ६५00 टन ऊस गाळप करणार असल्याचे असे प्रतिपादन दौंडचे आमदार तथा भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले. पाटस ता. दौंड येथे भीमा पाटस कारखान्याच्या ३८ व्या गाळप शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना कुल म्हणाले की, हंगामासाठी तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज झाली आहे. चालु वषीर्चा हंगाम हा ऐतिहासिक हंगाम आहे. येत्या १ नोव्हेंबरपासुन ३00 कामगारांना कायम करत आहोत. कामगारांनी संस्थेशी प्रामाणिक राहावे. गेल्या वर्षी ऊसाची रिकव्हरी कमी राहील्याचा फटका बसल्याने यावर्षी रिकव्हरी ११.५0 होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या गळीत हंगामाचा ३५ कोटी फायदा झाल्याने कजार्चे पुनर्गठन करता आले.तालुक्यातील शेतकर्यांच्या मालकीचा हा एकमेव कारखाना असल्याने सर्वांनी सहकार्य केल्यास गाळपाचा उच्चांक होईल. महाराष्ट्र शासनाने इतिहासात राजगड कारखान्यानंतर भीमा पाटस या २ कारखान्यांना मदत केली आहे. इथेनॉल, कोजन व साखरेचे उत्पादन पहिल्या दिवसांपासुन घेणार असल्याचे मत कुल यांनी व्यक्त केले.यावेळी प्रेमसुख कटारिया म्हणाले की, कारखान्याला सहकार्य करण्याऐवजी कारखाना बंद पाडुन राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा डाव होता. यंत्रणा सज्ज असल्याने डाव धुळीस मिळाला आहे. उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक विकास शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार रंजना कुल, नगराध्यक्षा शितल कटारीया व तालुक्यातील सर्व महिला पदाधिकार्यांना मोळी टाकण्याची संधी मिळाली.यावेळी सुरेश शेळके, आबासाहेब निबे, निळकंठ शितोळे, माऊली ताकवणे, पूनम दळवी, धनाजी उपस्थित होते.
पेमेंट वेळेवर मिळण्यासाठी ४ प्लँन तयार
आमदार राहुल कुल म्हणाले की, गेल्या वर्षी साखरेचे दर कोसळल्याने वेळेत सभासदांचे पैसे देवु शकलो नाही. यावर्षी सभासदांचे बील दर पंधरवड्याला दिले जाईल. यासाठी अे. बी. सी. डी. असे ४ प्लॅन आहेत.त्यामुळे बिल वेळेतच मिळेल असा विश्वास कुल यांनी व्यक्त केला.