भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:08+5:302021-04-04T04:10:08+5:30
ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर उघडण्यास काही अटींसह परवानगी दिली. मात्र मागील दोन ...
ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर उघडण्यास काही अटींसह परवानगी दिली. मात्र मागील दोन तीन आठवड्यांपासून राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने देवदर्शनासाठी भाविकांची संख्या कमी होवून मंदिर परीसरामध्ये शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळत होते. परंतु राज्या प्रमाणेच पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रमाणे आज शनिवारी (दि ३ रोजी) दुपारी तीन वाजता पूजा आरती करुन मंदीर बंद करण्यात आले.भाविकांनी दर्शनासाठी न येता घरी थांबुन काळजी घ्यावी.शासन निर्णयानंतर मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येईल.त्यामुळे भाविकांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येऊ नये.असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.दरम्यानच्या कालावधीमध्ये ठराविक ब्रम्हवृंद व गुरव बांधवांच्या उपस्थितीत नित्यनियमाने पवित्र शिवलिंगाची पुजा, आरती करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात आले आहे,अशी माहिती भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दत्तात्रय कौदरे यांनी दिली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद करण्यात आले.