हर हर महादेव! भीमाशंकर यात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात; श्रावणी सोमवार मंगलमय वातावरणात होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 07:09 PM2022-07-31T19:09:56+5:302022-07-31T19:10:09+5:30

भीमाशंकर कडे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सतत नियोजन केले जात आहे

Bhimashankar Yatra preparations begin Shravani will be held on Monday in an auspicious atmosphere | हर हर महादेव! भीमाशंकर यात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात; श्रावणी सोमवार मंगलमय वातावरणात होणार

हर हर महादेव! भीमाशंकर यात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात; श्रावणी सोमवार मंगलमय वातावरणात होणार

googlenewsNext

भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रा यावर्षी कोरोना नंतर पहिल्यांदाच मंगलमय वातावरणात होत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच प्रचंड गर्दी दिसत असून यात्रेचे नियोजन भीमाशंकर देवस्थान व प्रशासन करत आहे. भीमाशंकर कडे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सतत नियोजन केले जात असल्याचे भीमाशंकर देवस्थान संस्थान अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे यांनी सांगितले.

देवस्थानने जोरदार तयारी केली असून एस. टी. च्या जादा गाडया, आरोग्य सुविधा, दर्शनबारी, पाणी पुरवठा आदी अनेक गोष्टींची तयारी केली आहे. यासाठी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, आंबेगाव तहसिलदार रमा जोशी यांनी भीमाशंकर श्रावण यात्रा निमित्त विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, देवस्थान विश्वस्त यांच्या वारंवार बैठका व प्रत्यक्ष पाहणी करून यात्रेबाबत सुचना केल्या आहे.

यावर्षी भीमाशंकर श्रावण महिना यात्रा स्वच्छ व प्लॅस्टिक मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बाहेरून येणा-या भाविकांनी प्लॅस्टिक घेऊन येऊ नये अथवा भीमाशंकरमध्ये कोठेही कचरा घाण टाकू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानका पर्यंत एस टी महामंडळाच्या मिनी बस ठेवण्यात आल्या आहे. श्रावणी सोमवार व महाशिवरात्र यात्रेत पुर्वी येत असलेल्या अडचणी विचारात घेवून बंदोबस्तात बदल करण्यात आले आहेत. घोडेगाव व खेड या दोन पोलीस ठाण्याने आपला वेगवेगळा बंदोबस्त नेमला आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे बॉम्ब शोधक पथक, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, मंदिराजवळ व पायऱ्यांच्या सुरूवातीला वॉच टॉवर, डॉगस्कॉड, हॅंडमेटल डिडेक्टर अशी विविध अत्याधुनिक यंत्रणेसह दंगा काबुची २ पथकांसह घोडेगाव पोलीसांनी १९ अधिकारी, ९० पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच पोखरी घाट ते श्री क्षेत्र भीमाशंकर दरम्यान धांगडधिंगा घालणा-या व्यक्तिंवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी फिरते पथक तैनात करण्यात आले असल्याचे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.

Web Title: Bhimashankar Yatra preparations begin Shravani will be held on Monday in an auspicious atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.