भोर-अक्कलकोट बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:34+5:302021-07-11T04:08:34+5:30
या बससेवेचा शुभारंभ आज आगारप्रमुख युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एस.टी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, सचिन ...
या बससेवेचा शुभारंभ आज आगारप्रमुख युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी एस.टी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, सचिन कुंभार, प्रदीप शिनगारे, माऊली दानवले, शंकरराव गुरव, कोडीबा जाधव, रवींद्र कदम, रवींद्र धुमाळ, विजय मोरे, सोपान नवघणे, नितीन शिर्के, मनोज पाटणे, पंढरीनाथ गर्जे, किसन राऊत, बापू दामगुडे, मधुकर मालुसरे, चालक विठ्ठल दानवले उपस्थित होते.
ही बस भोरमधून शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता सुटणार असून, अक्कलकोट येथे दुपारी ३:३० वाजता पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटवरून सकाळी ८:०० वाजता सुटणार व भोर येथे दुपारी २ वाजता पोहोचणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त प्रवाशांना पंढरपूर व अक्कलकोट दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. या बसला प्रतिसाद मिळाला तर कायमस्वरूपी यामार्गावर बस चालू ठेवण्यात येणार असल्याचे भोर आगाराचे आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी सांगितले.
१० भोर
भोर-अक्कलकोट एसटीबसचा शुभारंभप्रसंगी युवराज जेधे व इतर.