भोर-महाड रस्ता खचू लागला, वाहतूक बंद होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:47+5:302021-07-29T04:10:47+5:30
यामुळे रस्ता खचू लागला असून वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मोऱ्या मोकळ्या करुन रस्त्याची डागडुजी ...
यामुळे रस्ता खचू लागला असून वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मोऱ्या मोकळ्या करुन रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
भोर तालुक्यात मागील आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे भोर-महाड रस्त्यावर २२ ठिकाणी दरडी पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरडी हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र, वारवंड गावाजवळ असलेल्या मोरीत दरडी पडल्यामुळे दगड माती जाऊन मोरी बंद होऊन संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
यामुळे रस्ता तुटला असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. यामुळे भविष्यात रस्ता खचल्यास वाहतूक बंद होणार आहे.
दरम्यान, रस्ता खचल्यास भोर बाजूकडून महाडकडे जाणारी वाहतूक बंद झाल्यास वारवंड, शिरगाव, पाथरटेकवाडी गावाची अडचण होणार आहे तर डोंगरातील लोकांना भोरकडे येता येणार नाही. त्यामुळे मोरी दुरुस्त करण्याची मागणी वारवंडचे सरपंच लक्ष्मण दिघे यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने महाड रस्त्यावरील वारवंड येथील मोरी त्वरित दुरुस्त करावी आणि रस्त्यावरुन वाहणारे पाणी बंद करावे. यामुळे मोरी तुटणार नाही आणि वाहतूक सुरळीत राहील.
२८ भोर
वारवंड गावाजवळ मोरी तुटली असून पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचबरोबर रस्त्याचा काही भागही खचला आहे.