वारकरी प्रवाशांसाठी भोर-पंढरपूर-अक्कलकोट एसटी बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:48+5:302021-07-10T04:09:48+5:30
भोर, शिरवळ, लोणंद, फणटण, माळशिरस, मोहोळ, सोलापूर यामार्गे ही बस अक्कलकोट येथे जाणार आहे. एसटी बससेवेचा शुभारंभ आज आगारप्रमुख ...
भोर, शिरवळ, लोणंद, फणटण, माळशिरस, मोहोळ, सोलापूर यामार्गे ही बस अक्कलकोट येथे जाणार आहे. एसटी बससेवेचा शुभारंभ आज आगारप्रमुख युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, सचिन कुंभार, प्रदीप शिनगारे, माऊली दानवले, शंकरराव गुरव कोंडीबा जाधव, रवींद्र कदम, रवींद्र धुमाळ, विजय मोरे, सोपान नवघणे, नितीन शिर्के, मनोज पाटणे, पंढरीनाथ गर्जे, किसन राऊत, बापू दामगुडे, मधुकर मालुसरे, चालक विठ्ठल दानवले उपस्थित होते. ही बस शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता सुटणार असून, अक्कलकोट येथे दुपारी ३:३० वाजता पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटवरून सकाळी ८:०० वाजता सुटणार व भोर येथे दुपारी २ वाजता पोहोचणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त प्रवाशांनी पंढरपूर दर्शन व अक्कलकोट दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. बसला प्रतिसाद चांगला मिळाल्यास भोर आगाराचे आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी सांगीतले.
--
फोटो क्रमांक : ०९भोर एसटी
फोटो ओळी : भोर अक्कलकोट एसटीबसचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आगारप्रमुख युवराज जेधे व इतरा फोटो
090721\09pun_4_09072021_6.jpg
फोटो क्रमांक : ०९भोर एसटी फोटो ओळी : भोर अक्कलकोट एसटीबसचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आगार प्रमुख युवराज जेधे व इतरा फोटो