भोर पोलिसांची १५० पर्यटकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:57+5:302021-07-19T04:07:57+5:30

जिल्हाधिकारी पुणे व पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडील कार्यालयीन आदेशानुसार जिल्ह्यातील कोरोनाचा संक्रमणाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन वीकेंडला पर्यटनावर ...

Bhor police cracks down on 150 tourists | भोर पोलिसांची १५० पर्यटकांवर कारवाई

भोर पोलिसांची १५० पर्यटकांवर कारवाई

googlenewsNext

जिल्हाधिकारी पुणे व पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडील कार्यालयीन आदेशानुसार जिल्ह्यातील कोरोनाचा संक्रमणाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन वीकेंडला पर्यटनावर नियम मोडणा-यांवर अंमलबजावणी होण्यासाठी आदेश निर्गमित केले होते.

त्यानुसार भोर पोलीस स्टेशन हद्दीतील भोर बाजारपेठ, महाड नाका, रायरेश्वर किल्ला, विचित्रगड, वरंध घाट येथे विशेष मोहिमेअंतर्गत विनामास्क, विनाकारण, गड-किल्ल्यांना व पर्यटनस्थळांना भेटी देणारे पर्यटक नियमांचे उल्लंघन करणा-या अशा १५० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. त्यांना कोरोनाचा वाढत असणारा प्रभावाचा सूचना देऊन पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना परत पाठवले. तसेच बाजारपेठेत वीकेंडचे उल्लंघन करणारी दुकाना अास्थापना यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केली. यावेळी सहायक फौजदार शिवाजी काटे अशोक खुटवड, सुभाष गिरे, प्रमिला निकम, काळे, मोरे, मखरे, अनिल हिपरकर, पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथक यांनी ही कारवाई केलेली आहे.

पोलीस विभाग व प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, की भोर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गडकिल्ले व पर्यटनस्थळे हे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. तरी कोणीही पर्यटन करू नये किंवा भेटी देऊ नये. यापुढे विनामास्क, विनाकारण फिरणारे तसेच पर्यटनासाठी येणारे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Bhor police cracks down on 150 tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.