भोर तालुक्यात ७३ पैकी ४६ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:15+5:302021-01-20T04:11:15+5:30
येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकारवरील माहिती दिली. यावेळी कृष्णा शिनगारे, राजेश काळे, राजेंद्र शेटे कार्यकर्ते उपस्थित ...
येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकारवरील माहिती दिली. यावेळी कृष्णा शिनगारे, राजेश काळे, राजेंद्र शेटे कार्यकर्ते उपस्थित होते.
भोर तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ६३ गावांच्या निवडणुका लागल्या होत्या. निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशी लढत झाली. बिनविरोध झालेल्या १० गावांपैकी नेरे, आळंदे महुडेबु, आळंदेवाडी, कापुरव्होळ, सावरदरे, चिखलगाव, कासुर्डी खे.बा या ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या विचाराचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर निवडणूक लागलेल्या ६३ पैकी ३८ ग्रामपंचायतीत काँग्रेसने विजय मिळविला आहे. यात वेळू भोंगवली गटातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांशी ग्रामपंचायती काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. यात मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामुळे सदर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुसंडी मारत तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादीने ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला आहे. शिवसेने आपल्याकडील अनेक ग्रामपंचायती गमवल्या आहेत, तर भाजपाला दिवळे व केळवडे गावात सदस्यवगळता एकही ग्रामपंचायत जिंकता आलेली नाही.
वेल्हे तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीपैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, त्यातील ९ ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या विचाराचे सदस्य विजयी झाले आहेत. यात रुळे, निवी निगडे घोल, वरसगाव, मांगदरी, कातवडी, वांगणी, वांगणीवाडी या गावांचा समावेश आहे, तर निवडणूक झालेल्या २० पैकी ११ ग्रामपंचायती या काँग्रेसच्या विचाराच्या आहेत, यात रांजणे मालवली, अंत्रौली, घिसर, मार्गासनी, वेल्हेबु, साखर, मेरावणे ही गावे असून, तर १० गावात संमिश्र आल्या आहेत. ३१ पैकी २० गावे काँग्रेसच्या विचाराच्या आल्या आहेत, तर मुळशी तालुक्यात पूर्व पट्यातील कासारसाई, मारुंजी, जांबे, कुळे उरवडे, भरे, मुगावडे या ग्रामपंचायती काँग्रेसच्या विचाराच्या निवडून आल्या आहेत. तर घोटावडे चांदे हिंजवडी लवळे कासार आंबोली कशिम कोळवण कातरखडक या मोठ्या गावात संमिश्र विचाराच्या आल्याचे सांगून, आमदार संग्राम थोपटे यांनी सर्वाचे आभार मानले आहेत.
मागील ४० वर्षांपासून भोर वेल्हे तालुक्यात ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व कायम
भोर वेल्हे तालुक्यात यापूर्वी माजी मंत्री अनंतराव थोपटे आणी मागील १५ वर्षांपासून आमदार संग्राम थोपटे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालून गावपातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र करून अंतर्गत वाद मिटवून उमेदवारी अर्ज भरण्यापासून सर्व मदत करुन निवडणुकीत आपली सत्ता कायम राखली आहे. याचा फायदा त्याना नेहमी विधानसभा निवडणुकीत होत असतो.