भोर लसीकरण केंद्रावर स्थानिकांपेक्षा बाहेरील नागरिकांची गर्दी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:12 AM2021-05-09T04:12:24+5:302021-05-09T04:12:24+5:30

भोर तालुक्यातील लोक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. ऑनालाईन नोंदणी बंद करून ऑन द स्पॉट नोंदणी व लसीकरणाची मागणी माजी ...

The Bhor vaccination center is more crowded with outsiders than locals | भोर लसीकरण केंद्रावर स्थानिकांपेक्षा बाहेरील नागरिकांची गर्दी अधिक

भोर लसीकरण केंद्रावर स्थानिकांपेक्षा बाहेरील नागरिकांची गर्दी अधिक

Next

भोर तालुक्यातील लोक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.

ऑनालाईन नोंदणी बंद करून ऑन द स्पॉट नोंदणी व लसीकरणाची मागणी माजी उपनगराध्यक्ष सुमंत शेटे व नगरसेवक यांनी निवेदनाव्दारे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याकडे केली आणि लसीकरण बंद पाडले होते.

या वेळी उपनगराध्यक्ष अमित सागळे, गटनेते सचिन हर्णसकर नगरसेवक सुमंत शेटे,समिर सागळे, विश्वनाथ रोमण, बजरंग शिंदे, देवीदास गायकवाड, गणेश मोहिते, राजू बहिरट व नगरसेवक उपस्थित होते.

उपजिल्हा रुग्णालय भोर येथिल लसीकरण केंद्रावर दररोज १०० लोकांचे

लसीकरण होते. या केंद्रावर पुणेसह बाहेरील ७० ते ८० लोकांचे

लसीकरण होते तर स्थानिकांचे २० ते ३० लोकांचेच लसीकरण होते. नागरीकांना दिवसभर विनाकारण रांगेत थांबावे लागते आणी लसीकरण न करताच जावे लागात आहे. यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, भोर नगरपलिकेच्या नगरसेवकांनी ऑनलाईन नोंदणी बंद करुन ऑन द स्पॉट नोंदणी करावी बाहेरुन येणाऱ्या लोकांचे लसीकरण न करता स्थानिकांचे करावे बाहेरच्या लोकांमुळे कोविड रुग्ण वाढु शकतात. त्यामुळे कोविड टेस्ट करावी म्हणून निवेदन देऊन लसीकरण बंद पाडले होते. त्यानंतर पुणेसह बाहेर गावावरुन लसीकरणाला येणाऱ्या लोकांची कोविड टेस्ट केल्यावर दोनजण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे लसीकरणाला बाहेरुन येणाऱ्या पेक्षा भोर तालुक्यातील लोकांनाच प्राधान्य दयावे अशी मागणी उपनगराध्यक्ष अमित सागळे यांनी केली आहे.

--

चौकट

रेंज नाही, मोबाईल साक्षरता कमी त्यामुळे स्थानिक वंचित

--

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी केल्यावरच लसीकरण करता येत आहे. याचा फायदा घेत पुणे व इतर ठिकाणचे नागरिक त्वरित नोंदणी करत आहेत. मात्र, भोर तालुका दुर्गम डोंगरी असून अनेक ठिकाणी नेटवर्क नाही अनेकांकडे मोबाईल नाहीत, काहीना वापरता येत नाहीत त्यामुळे नोंदणी करताना अडचणी येऊन नोंदणी होत नाही, त्यामुळे भोर तालुक्यापेक्षा बाहेरील लोक नोंदणी करून भोरला लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहात आहेत.

Web Title: The Bhor vaccination center is more crowded with outsiders than locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.