Bhosari Maharashtra Assembly Election 2024 Result: भोसरीच्या मतमोजणीत नऊ हजार मते जास्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:36 PM2024-11-25T17:36:50+5:302024-11-25T17:36:50+5:30

पिंपरी : भोसरीच्या मतमोजणीत प्रत्यक्ष केंद्रावर झालेले मतदान आणि मोजणीमध्ये मतांची तफावत आढळली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक विभागाने दिलेल्या ...

Bhosari Maharashtra Assembly Election 2024 Result Nine thousand votes more in Bhosari vote count | Bhosari Maharashtra Assembly Election 2024 Result: भोसरीच्या मतमोजणीत नऊ हजार मते जास्त!

Bhosari Maharashtra Assembly Election 2024 Result: भोसरीच्या मतमोजणीत नऊ हजार मते जास्त!

पिंपरी :भोसरीच्या मतमोजणीत प्रत्यक्ष केंद्रावर झालेले मतदान आणि मोजणीमध्ये मतांची तफावत आढळली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ३ लाख ६५ हजार ५५ मतदान झाले होते. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीत ३ लाख ७४ हजार ५४७ मतांची मोजणी करण्यात आली आहे. तब्बल ९४९२ मते जास्त असल्याचे समोर आले आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची अंतिम आकडेवारी शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झाली. त्यामध्ये विजयी उमेदवार महेश लांडगे यांना २ लाख १३ हजार ६२४, तर पराभूत अजित गव्हाणे यांना १ लाख ४९ हजार ८५९ मते मिळाली. बलराज कटके यांना १९०९, अमजद खान ३११७, जावेद शहा २३२, अरुण पवार १४७, खुबुद्दीन होबळे १११, गोविंद चुनचुने २९०४, हरिश डोळस १७३, रफिक कुरेशी ३०१ आणि शलाका कोंडावर यांना ३०१ मते मिळाली. ही एकूण आकडेवारी ३ लाख ७२ हजार ७१९ होत आहे.

‘नोटा’ म्हणजेच वरीलपैकी एकही योग्य उमेदवार नसल्याचे मत २६८५ मतदारांनी नोंदवले. ५४ मते अवैध ठरली. ही सगळी संख्या ३ लाख ७४ हजार ५७४ होते. मात्र, मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली आकडेवारी अंदाजित असून दुसऱ्या दिवशी सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ३ लाख ७४ हजार ४४२ मतदान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मतमोजणीची आकडेवारी बरोबर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुधवारी मतदान झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत माहिती येत होती. तेव्हा जाहीर केलेली टक्केवारी अंदाजित होती. अंतिम आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ती आणि पोस्टल मतदानाची बेरीज करण्यात आली. त्यानुसार एकाही मताचा फरक नाही.
- रेवणनाथ लबडे, निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी.

Web Title: Bhosari Maharashtra Assembly Election 2024 Result Nine thousand votes more in Bhosari vote count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.