भोसरी एमआयडीसी कंपनीला आग लागून सुमारे दोन कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 08:29 PM2023-03-07T20:29:07+5:302023-03-07T20:31:07+5:30
घटनेची माहिती मिळतात संत तुकाराम नगर, पिंपरी, भोसरी, चिखली येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्या...
नेहरूनगर (पुणे) :भोसरीएमआयडीसी येथील एजिओ या औषधांच्या कंपनीला मंगळवारी सकाळी ६:३० सुमारास आग लागून नुकसान झाले.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीएमआयडीसीमधील टी ब्लॉक प्लॉट क्रमांक ८१/८२ येथील एजिओ या औषधांच्या कंपनीमध्ये मंगळवारी सकाळी काम सुरू असताना सकाळी ६:३० च्या सुमारास कंपनीमध्ये असलेल्या कर्मचारी योगेश्वर पाटील यांनी कंपनीमध्ये पहिल्या मजल्यावर औषधांचा साठा असलेल्या ठिकाणावरून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर तातडीने अग्निशामक दलाला कळविण्यात आले.
घटनेची वर्दी मिळतात संत तुकाराम नगर, पिंपरी, भोसरी, चिखली येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्या. एकूण ५ बंबांद्वारे ही आग आटोक्यात आणली. फायर ऑफिसर उदय वानखेडे यांच्यासह लिडींग फायरमन सारंग मंगरूळकर, विठ्ठल सपकाळ, शहाजी कोपनर, विठ्ठल भुसे, लक्ष्मण होवाळे, निखिल गोगावले, चंद्रशेखर घुले, वाहन चालक रुपेश जाधव, दत्तात्रय रोकडे, अमोल खंदारे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.