भोसरीतील तरुणांना बुधवार पेठेत लूटले; २ महिलांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:43 PM2017-11-28T16:43:07+5:302017-11-28T16:45:50+5:30

व्यवसायानिमित्ताने बुधवार पेठ परिसरात आलेल्या दोन तरुणांना लुटल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी २ महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.

Bhosari youths looted in budhwar peth; 2 women arrested by Vishrambaug police | भोसरीतील तरुणांना बुधवार पेठेत लूटले; २ महिलांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

भोसरीतील तरुणांना बुधवार पेठेत लूटले; २ महिलांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील भोई गल्ली येथील प्रकारविश्रामबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही महिलांना घेतले ताब्यात

पुणे : व्यवसायानिमित्ताने बुधवार पेठ परिसरात आलेल्या दोन तरुणांना लुटल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी २ महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही तरुण भोसरी परिसरातील आहेत.
पूनम श्रीनिवास कांबळे (वय ३०, रा. भोई, गल्ली, बुधवार पेठ) व गीता चंद्र्र नाईक (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी वाघमोडे (वय २८, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी वाघमोडे हे व्यावसायिक आहेत. त्यांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करायची होती. त्यामुळे ते त्यांचे मित्र सागर लाटे यांच्याबरोबर रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील भोई गल्ली येथून पायी निघाले होते. त्यावेळी संबंधित महिलांनी त्या दोघांच्या हाताला धरून ओढत एका खोलीत नेले. खोलीचे दार बंद करून वाघमोडे यांच्या खिशातील सहा हजार ४०० आणि मित्र सागर यांच्या खिशातील तीन हजाराची रोकड काढून घेतली. त्यानंतर त्यांना खोलीतून बाहेर काढले.
तरुणांनी तत्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास महिला सहायक निरीक्षक वर्षा शिंदे या करत आहेत.

Web Title: Bhosari youths looted in budhwar peth; 2 women arrested by Vishrambaug police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.