भोसे ते वडगाव घेनंद पानंद रस्ता खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:09 AM2021-03-18T04:09:58+5:302021-03-18T04:09:58+5:30
भोसे ते वडगाव घेनंद रस्ता मागील अनेक दिवसांपासून बंद होता. परिणाम येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यास अडचण निर्माण ...
भोसे ते वडगाव घेनंद रस्ता मागील अनेक दिवसांपासून बंद होता. परिणाम येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यास अडचण निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच दिगंबर लोणारी, आण्णासाहेब लोणारी, संजय पठारे, जालिंदर कुटे व संबंधित शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन सदरचे रस्ते शेतीमाल ने-आण करण्यासाठी, वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी लोकसहभागातून खुले करण्यास सहमती दर्शवली.
त्यानुसार मंगळवारी (दि.१६) मंडल अधिकारी विजय घुगे, उपसरपंच दिगंबर लोणारी आदींनी रस्त्याची पाहणी करत रस्त्याच्या कामास अधिकृतरीत्या सुरुवात करून दिली. याप्रसंगी गणेश दळवी, गणेश कुटे, कोंडीबा कुटे, सागर लोणारी, संपत कुटे, ज्ञानेश्वर कुटे, सिध्देश कुटे, विजय काळे, विश्वास गांडेकर, चंद्रकांत गांडेकर, शीतल कुटे, लंकाबाई कुटे, रंजना पठारे, रोहिणी पिंगळे, पुजा गुंडगळ, तलाठी सारिका विटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
भोसे (ता. खेड) येथे पानंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना मान्यवर.(छाया : भानुदास पऱ्हाड)