सीए परीक्षेत रायपूरच्या भ्रमर जैन प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:13 AM2021-03-23T04:13:27+5:302021-03-23T04:13:27+5:30
आयसीएआयतर्फे नव्या अभ्यासक्रमानुसार घेतलेल्या अंतिम परीक्षांचा दोन्ही ग्रुपचा निकाल ६ टक्के लागला.पहिल्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या १८,२९७ विद्यार्थ्यांपैकी ...
आयसीएआयतर्फे नव्या अभ्यासक्रमानुसार घेतलेल्या अंतिम परीक्षांचा दोन्ही ग्रुपचा निकाल ६ टक्के लागला.पहिल्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या १८,२९७ विद्यार्थ्यांपैकी १,१९८ (६.५५ टक्के) विद्यार्थी तर दुसऱ्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या १८,९९६ विद्यार्थ्यांपैकी ३,४०९ (१८.०४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालानुसार एकूण १,२७० विद्यार्थ्यांना सनदी लेखापाल घोषित केले.
जुन्या अभ्यासक्रमानुसार घेतलेल्या अंतिम परीक्षेत दोन्ही ग्रुपचा निकाल १.४१ टक्के लागला. दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या ३,११६ विद्यार्थ्यांपैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फक्त पहिल्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या ८,६८६ विद्यार्थ्यांपैकी ४१६ म्हणजेच ४.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फक्त दुसऱ्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या १३,२१५ विद्यार्थ्यांपैकी १,६१४ म्हणजेच १२.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फाउंडेशन परीक्षेचा निकाल २४.८९ टक्के लागला असून परीक्षा दिलेल्या २७,७०८ विद्यार्थ्यांपैकी ६,९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.