भुलेश्वर विद्यालयाला मिळाली ई-लर्निंग सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:31+5:302021-09-17T04:14:31+5:30
या सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. श्री भुलेश्वर विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या इमारतीमध्ये ई-लर्निंग ...
या सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. श्री भुलेश्वर विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या इमारतीमध्ये ई-लर्निंग सुविधा असावी ही मागणी लक्षात घेऊन विद्यालयाचे माजी विद्यार्थी महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथील शिक्षक विकास मुरलीधर यादव यांनी कंपनीतील अनिकेत सुरेश ढुमे यांच्याकडे शिफारस केली होती, त्यानुसार ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ई-लर्निंग सुविधेसंदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास शिंदे, भुलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरुण यादव यांच्या पाठपुराव्याने भुलेश्वर विद्यालयास ई-लर्निंग साहित्य (९५,१८०) रुपयाचे साहित्य विद्यालयात प्राप्त झाले.
या सर्व साहित्याचा उपयोग चालू शैक्षणिक वर्षातील विद्यालयात शिकणारे विद्यार्थी व भविष्यात विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे.
---
फोटो क्रमांक : १६भुलेश्वर विद्यालय
फोटो ओळ - भुलेश्वर विद्यालयास बेंटली कंपनी कडुन ई लर्निंग सुविधा देण्यात आली.