इंदापूर येथे रमाई आवास घरकुलाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:26+5:302021-07-25T04:10:26+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेल्या व रमाई आवास योजनेचे लाभार्थी असलेल्या सविता उत्तम मखरे व हनुमंत मरीबा ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेल्या व रमाई आवास योजनेचे लाभार्थी असलेल्या सविता उत्तम मखरे व हनुमंत मरीबा मखरे यांच्या घरकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. २४) कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेविका राजश्री अशोक मखरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी इंदापूर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक व रमाई आवास योजनेचे अधिकारी भागवत मखरे, किरण लोंढे, प्रा. मयूर मखरे, सूरज मखरे, दर्याराज मखरे, युवा उद्योजक दीपक मगर व सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा म्हणाल्या की, इंदापूर शहरातील लाभार्थ्यांची मागील तीन वर्षांपासून मागणी होती. लाभार्थ्यांना घरे मिळावीत म्हणून पाठपुरावा चालू होता. शासनाला एकूण १२२ लाभार्थ्यांची यादी मान्यतेसाठी समाज कल्याण विभागाकडे सादर करण्यात आली होती. त्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या समितीच्या पाहणीनुसार ९४ लाभार्थी पात्र झाले असून त्यांना अनुदान प्राप्त झालेले आहे.
इंदापूर येथे रमाई आवास योजनेच्या घरकुलाच्या भूमिपूजन करताना नगराध्यक्षा व मान्यवर.