विठ्ठलमंदिराचे सभामंडप नूतनीकरण कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:11 AM2021-03-01T04:11:29+5:302021-03-01T04:11:29+5:30
या वेळी भूमिपूजन समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे,संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी ...
या वेळी भूमिपूजन समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे,संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच विठ्ठलभक्त उपस्थित होते.आकर्षक आखीव रेखीव व कोरीव सभामंडपासाठी सागवानी लाकूड वापरण्यात येणार असून, या कामासाठी होणारा ३० लाख रु.खर्च पाचुंदकर दाम्पत्याने श्री क्षेत्र पंढरपूर देवस्थानला देणगी दिली आहे.माझ्या मनातील इच्छा व मागील सलग ३० वर्षे न चुकता पंढरीची मी सपत्नीक करत असलेलो पायी वारी त्यामुळेच आम्हाला या सभामंडप नूतनीकरण कामाचे भूमिपूजन व त्यासाठी होणाऱ्या खर्च करण्याची संधी मिळाल्याचे माझे व माझ्या कुटुंबाचे भाग्याचे आहे, असे नानासाहेब पाचुंदकर यांनी यावेळी सांगितले. पाचुंदकर यांच्या देणगीतून अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिर येथे दर महिन्यातील चतुर्थी, तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर तसेच कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिराला आकर्षक विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते. देणगी दिल्याबद्द्ल समितीच्या वतीने नानासाहेब व चंद्रभागा पाचुंदकर यांचा सत्कार करण्यात आला.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्रीविठ्ठल मंदिरासमोरील सभामंडप नूतनीकरण कामाचे भूमिपूजन पाचुंदकर दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले.