घोडेगावमध्ये विविध कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:08 AM2021-06-24T04:08:52+5:302021-06-24T04:08:52+5:30
यामध्ये घोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत बाजीराव रोड सिमेंट रस्ता करणे, स्वराज्य चौक ते दत्तमंदिर सिमेंट रस्ता ...
यामध्ये घोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत बाजीराव रोड सिमेंट रस्ता करणे, स्वराज्य चौक ते दत्तमंदिर सिमेंट रस्ता करणे, क्रांती चौक येथे पंचायत समिती सदस्य अलका घोडेकर यांच्या निधीतून सिमेंट रस्ता करणे या कामाचे भूमिपूजन तसेच महाराष्ट्र बँक पाठीमागील सिमेंट रस्ता या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्या अलका घोडेकर, सरपंच क्रांती गाढवे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली घोडेकर, उपसरपंच सोमनाथ काळे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनील इंदोरे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल घोडेकर, गणेश घोडेकर, शोभा सोमवंशी, राजेश्वरी काळे, गणेश वाघमारे, उपतालुकाप्रमुख मिलिंद काळे, गोविंद काळे, प्रशांत काळे, आंबेगाव विद्या विकास मंडळ संचालक शिवाजी घोडेकर, पुरुषोत्तम भास्कर, अनिल घोडेकर, वैभव मंडलिक, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
घोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने पावसाळ्यात होणा-या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घोडेगाव शहरात धूरफवारणी व तणनाशक फवारणी चालू करण्यात आल्याचे सरपंच क्रांती गाढवे यांनी यावेळी सांगितले.
२३ घोडेगाव
घोडेगाव ग्रामपंचायतमधील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करताना कैलासबुवा काळे व इतर.