रेडा समाधी मंदिराच्या वीणामंडपाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:08+5:302021-07-05T04:09:08+5:30
श्रीक्षेत्र आळे येथील वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिराच्या वीणामंडप व इतर विकासकामांच्या निधीसाठी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हा ...
श्रीक्षेत्र आळे येथील वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिराच्या वीणामंडप व इतर विकासकामांच्या निधीसाठी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी दिले.
रेडा समाधी मंदिराच्या वीणामंडप बांधकामासाठी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद निधीतून ३५ लाख रुपये मंजूर झाले. या कामाचे भूमिपूजन आशाताई बुचके यांचे हस्ते पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, दिलीप गांजळे देवस्थान अध्यक्ष चारूदत्त साबळे, उपाध्यक्षपदी अविनाश कुऱ्हाडे, सचिव संतोष पाडेकर, खजिनदार संजय खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रसन्न डोके, माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, जी. एल. गुंजाळ, विघ्नहर संचालक संतोष खैरे, संतवाडी सरपंच नवनाथ निमसे, कोळवाडी सरपंच शैलाताई गाढवे, विश्वस्त धनंजय काळे, विलास शिरतर, म्हतु सहाणे, गिरीष कोकणे, ज्ञानदेव सहाणे, सुदर्शन भुजबळ, बाळासाहेब शेळके, संजय शिंदे, गोरक्ष दिघे, गोरक्ष गुंजाळ, बाजीराव निमसे, बाळशिराम डावखर, महेंद्र पाडेकर, आळे दूधसंस्था अध्यक्ष बापू गाढवे, माधव टकले, मंगल तितर सुनिता धोंगडे, दिगंबर घोडेकर, मुकुंद भंडलकर, नीलेश भुजबळ, व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे उपस्थित होते. धनंजय काळे, जीवन शिंदे, प्रसन्न डोके, संतोष खैरे यांची भाषणे झाली. या वेळी वीणामंडप बांधकामास १ लाख ११ हजार व ५१ हजार रुपये देणगी देणारे सुरेश शिंदे व गणपत शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिर वीणामंडप बांधकाम भूमिपूजन करताना जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके व मान्यवर.