नारायणगावला दर्गाह सभामंडपाचे भिंतीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:43+5:302021-09-27T04:12:43+5:30

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून हे विकासकाम केले जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ...

Bhumi Pujan of the wall of Dargah Sabhamandap at Narayangaon | नारायणगावला दर्गाह सभामंडपाचे भिंतीचे भूमिपूजन

नारायणगावला दर्गाह सभामंडपाचे भिंतीचे भूमिपूजन

Next

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून हे विकासकाम केले जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रशिद इनामदार आणि सामाजिक कार्यकर्ते हाजी रज्जाक कुरेशी होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, गणेश पाटे, राजेश बाप्ते, संतोष पाटे, आर्किटेक्ट निसार तांबोळी, हाजी सिद्दिकभाई शेख, प्रवीण दिवटे, हेमंत कोल्हे, दादामिया पटेल, मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त एजाज आतार, मेहबूब काझी, हाजी अली इनामदार, गफुर तांबोळी, हाजी सलिम मोमीन, सलिम मणियार, सलिम मोमीन (टेलर), कॉन्ट्रॅक्टर मुस्तफा अन्सारी, एजाज चौधरी, हमीद पिंजारी, शफी खान, अस्लम आतार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात पुणे येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट निसार तांबोळी यांनी नारायणगाव सुन्नी जामा मस्जिद उभारणीसाठी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल त्यांचा व ठेकेदार मुस्तफा अन्सारी यांचा तसेच मुस्लीम ओ. बी. सी. संघटनेच्या जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल एजाज चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेहबूब काझी यांनी केले. एजाज आतार यांनी आभार मानले.

फोटो ओळ - नारायणगाव सुन्नी जामा मस्जिद येथील हजरत सय्यद फजलशाह वली दर्गेचा सभामंडप व संरक्षण भिंतीचे भूमिपूजन नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते करण्यात आले .

260921\img-20210925-wa0105.jpg

????????? ?????? ???? ?????? ????? ???? ????? ?????? ??? ??????? ??????? ? ??????? ??????? ???????? ??????????? ????? ????? ???? ??????? ????? ??????? ??? .

Web Title: Bhumi Pujan of the wall of Dargah Sabhamandap at Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.