आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेच्या वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:52+5:302021-09-13T04:10:52+5:30
याप्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी उपनगराध्यक्षा पारूबाई तापकीर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव ...
याप्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी उपनगराध्यक्षा पारूबाई तापकीर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव नाना महाराज चंदिले, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, व्यवस्थापक तुकाराम महाराज मुळीक, नरहरी महाराज चौधरी, सचिन घुंडरे, नितीन घुंडरे आदींसह वारकरी, विद्यार्थी उपस्थित होते.
मोहिते-पाटील म्हणाले, शासनाने दिलेल्या एक कोटी देणगीच्या मदतीवर संस्थेने अवलंबून न राहता वसतिगृह इमारत तीन मजली करण्यासाठी प्रयत्न करावेत. या संस्थेने नव्या वसतिगृह इमारतीचे तयार केलेले संकल्प चित्र डिझाइनप्रमाणे तीन मजल्यांचे काम पूर्ण करावे. या संस्थेची ही परंपरा फार मोठी आहे. त्यासाठी लागणारा निधी देणगीच्या माध्यमातून, तसेच बांधकाम साहित्य वस्तूच्या रूपांना जमा करण्यासाठी माझीही मदत होईल. संस्थेचे कार्य व नावलौकिक फार मोठा असल्याने संस्थेच्या या इमारत बांधकामासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार मोहिते पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी केले. विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड यांनी आभार मानले.
१२ आळंदी
आळंदी - देवाची येथे वारकरी शिक्षण संस्थेच्या वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन करताना आमदार दिलीप मोहिते-पाटील व मान्यवर.