लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:15+5:302021-06-19T04:09:15+5:30

शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कार्यक्रमासाठी चाकण ...

Bhumipujan of beautification of Lingayat community cemetery | लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन

Next

शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कार्यक्रमासाठी चाकण शहराध्यक्ष चंद्रकांत हलगे, उपाध्यक्ष शिवाजी उगाणे, बांधकाम विभागाचे संतोष पवार, किशोर बोराटे, अशोक भाले, संजय शेटे, किरण खुडे, रवींद्र होडगे, मारुती नागसाखरे, विजय कंटीकर, महेंद्र हलगे, सुवर्णा शेटे, सचिन कंटीकर, चंद्रकांत स्वामी, चंद्रकांत खुडे, नंदकुमार शेटे उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गर्दी न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करावा अशी सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून व मास्क लावून हा कार्यक्रम करण्यात आला. चाकण लिंगायत समाजाचे सचिव अशोक भाले व शहराध्यक्ष चंद्रकांत घाडगे म्हणाले, चाकण येथे वीरशैव लिंगायत समाजाची सुमारे सहाशे कुटुंब वास्तव्यास आहेत. लिंगायत समाजात परंपरेनुसार अंत्यविधी हा समाधी (दफनविधी) पद्धतीने केला जातो. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शासनाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार राक्षेवाडी (चाकण) येथे वीस गुंठे जागा शासनाने स्मशानभूमीसाठी मंजूर केली होती. समाजातील दानशूर व्यक्तींनी लोकवर्गणी जमा करून या जागेचे सपाटीकरण केले आहे. परंतु, संरक्षकभिंत, निवाराशेड, पाण्याची टाकी प्रवेशद्वार अशा गोष्टींची आवश्यकता असल्याने आम्ही याविषयी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन मागणी केली. त्यांनी तातडीने दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला

चंद्रकांत स्वामी यांनी सुत्रसंचालन केले. आभार मारुती नागसाखरे यांनी मानले.

------------------------------------------------------

--

फोटो - वीरशैवलिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन.

Web Title: Bhumipujan of beautification of Lingayat community cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.