दुडेवाडी येथे ४० लाख रुपयांच्या रस्त्यांचे भुमिपुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:33+5:302021-03-17T04:10:33+5:30
माजी आमदार गावडे म्हणाले की उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांनी शासन ...
माजी आमदार गावडे म्हणाले की उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांनी शासन व जिल्हा परीषदेच्या माध्यमा मधुन मोठ्या प्रमानात कामे प्रत्येक गावात मंजुर केले आहेत . तसेच
निमगाव दुडे गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालयासाठी २० लाख रुपये देण्यात येणार आहे .
दुडेवाडी ता शिरूर येथे (४० लाख ) रुपयांच्या रस्त्यांचे भुमिपुजन शिरुरचे माजी आमदार गावडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस ते बोलत होते . या वेळी जिल्हा परीषद सदस्या सुनिताताई गावडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, माजी सरपंच दिपक दुडे पाटील, भिकाजी पानगे, जालिंदर पानगे, संजय पानगे , छबुराव वाघ, सुरेश पानगे,भाऊसाहेब दुडे, ग्रामपंचायत सदस्य शहाजी पवार, माऊली पानगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष साळभाऊ पानगे, संदीपभाऊ गायकवाड, अशोक खडसे,शाखा अभियंता चनाळे रावसाहेब, लहु साबळे, अशोक गावडे, पोपट पानगे,भाऊसाहेब कांदळकर, बंडु कांदळकर, रघुनाथ कांदळकर, संतोष पानगे, ग्रामसेविका शैला साबळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते . स्वागत माजी सरपंच जालिंदर पानगे यांनी तर आभार संदीप गायकवाड यांनी मानले .
दुडेवाडी ( निमगाव दुडे ) ता शिरूर येथे रस्त्यांचे भुमिपुजन करताना माजी आमदार पोपटराव गावडे , जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे, व ग्रामस्थ .