घोटवडेत विविध विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:28+5:302021-05-05T04:18:28+5:30
या कामामध्ये प्रामुख्याने धुमाळवाडी येथील अंतर्गत गटार व शोषखड्डा हे ग्रामपंचायत फंडातून (१० लाख ५० हजार) घेतलेले काम ...
या कामामध्ये प्रामुख्याने धुमाळवाडी येथील अंतर्गत गटार व शोषखड्डा हे ग्रामपंचायत फंडातून (१० लाख ५० हजार) घेतलेले काम पूर्ण झाले त्याचे उद्घाटन तर गोडाबेवाडी १ येथील अंतर्गत गटार व शोषखड्डा कामाचे भूमिपूजन झाले. त्या कामासाठी ग्रामपंचायत फंडातून ३ लाख ६६ हजार निधी मंजूर करण्यात आला. शेळकेवाडी अंतर्गत गटारासाठी पंचायत समिती १५ व्या वित्त आयोगातून तीन लाख रुपये निधी मंजूर झाला त्याकामाचे भूमिपूजनही झाले. घोटवडे गावठाण महादेव मंदिर सभागृहासाठी पंचायत समिती १५ व्या वित्त आयोगातून ५ लाख रुपये मंजूर झाले व त्याही कामाचे भूमिपूजन झाले.
या वेळी भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भिमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके, नवनाथ भेगडे संतोष गोडाबे, हनुमंत घोगरे, संभाजी गोडाबे, भाग्यश्री देवकर, सारिका खाणेकर, वैशाली कुंभार, सोनाली मातेरे, निकिता घोगरे, मंगल गोडाबे, सरपंच एकनाथ शेळके, बाजीराव धुमाळ, योगेश गोडाबे, काळूराम गोडाबे, शारदा गोडाबे, माजी उपसरपंच कांचन धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते तानाजी धुमाळ, माजी सैनिक रवी धुमाळ, शिवाजी देवकर, संदीप कुंभार, अनिल मातेरे, किरण शेळके उपस्थित होते. अशी माहिती कार्यक्षम ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर यांनी दिली.