थेऊर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:03+5:302021-07-19T04:08:03+5:30
यावेळी राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे, प्रभाकर काकडे, राज्य साखर कामगार ...
यावेळी राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे, प्रभाकर काकडे, राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सरपंच शीतल काकडे, ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, विठ्ठल काळे, राहुल कांबळे, शशिकला कुंजीर, सीमा कुंजीर, रूपाली रसाळ, मंगल धारवाड, गौतमी कांबळे, ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर पाटील, विलास किसन कुंजीर, शहाजी जाधव, अष्टविनायकचे संचालक शरद काकडे, माजी सदस्य मारुती कांबळे, सुखराज कुंजीर उपस्थित होते.
थेऊर ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद असून आमदार, खासदार यांच्याकडील निधी न घेताही ग्रामपंचायतीचा विकासकामांचा वेग आदर्शवत आहे. कोरोना काळातही विकासकामे निरंतर सुरू आहेत. श्रीक्षेत्र थेऊर गावाला, पालकमंत्री अजितदादा पवार व खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून विकास निधी मिळण्यासाठी मदत करणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या मागणी संदर्भात, थेऊर येथे सध्या पोलीस मदत केंद्र असून, गृहमंत्री व पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून पोलीस उपकेंद्र मंजूर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, थेऊर-काकडे मळा हा रस्ता सध्या प्रचंड वर्दळीचा झाला असून, रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण होणे ही काळाची गरज असल्याने, रस्ता होणेची मागणी यावेळी, आमदार अशोक पवार यांच्याकडे, तात्यासाहेब काळे व युवराज हिरामण काकडे यांनी केली.