बारामतीचा भुसार,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:00+5:302021-04-19T04:09:00+5:30
बारामती: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोमवार (दि. १९) व मंगळवार (दि. २०) भुसार व तेलबिया धान्य बाजार ...
बारामती: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोमवार (दि. १९) व मंगळवार (दि. २०) भुसार व तेलबिया धान्य बाजार कोरोना प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे फळे व भाजीपाला मार्केट सुरू राहील, अशी माहिती सभापती वसंतराव गावडे यांनी दिली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कर्मचारी, आडते, व्यापारी, हमाल, मापाडी यांना कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. परिणामी, बाजार समिती, व्यापारी व हमाल प्रतिनिधी यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. या कालावधी मध्ये धान्य बाजार आवाराचे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याने सर्व व्यवहार बंद राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल फेरआदेश होर्ईपर्यंत विक्रीस आणू नये, असे आवाहन उपसभापती दत्तात्रय सणस यांनी बारामती केले आहे. आवारात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी धान्य बाजार आवारातील किरकोळ विक्रीची दुकाने बंद राहतील. तसेच बारामती धान्य बाजाराचे गेट तीन दिवस बंद राहणार आहे शेतकरी व सर्व बाजार घटकांनी कृपया सहकार्य करावे, अशी विनंती सचिव अरविंद जगताप यांनी केली आहे.