Video: लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 12:34 PM2022-07-06T12:34:15+5:302022-07-06T12:35:21+5:30
स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर वर्षाविहारासाठी गर्दी केली
लोणावळा : लोणावळा शहरांमधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी आज सकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाले. धरण ओव्हरफ्लो झाल्याचे कळताच स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर वर्षाविहारासाठी गर्दी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरण भरण्यास विलंब लागला होता. मात्र दोन चार दिवसांच्या संततधार पावसाने धरण भरून वाहू लागले आहे. यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी धरण भरल्यानंतर देवाला साकडे घालत यावर्षीचा पर्यटन हंगाम निर्विघ्नपणे जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
भुशी धरण हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. लाखो पर्यटक दरवर्षी याठिकाणी भेट देत वर्षाविहाराचा आनंद लुटतात. येणार्या शनिवार व रविवारी याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे व्यावसाय बंद असल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली होती. यंदा मात्र ही कसूर भरून निघणार आहे.
लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण #PuneRain#lonavalapic.twitter.com/hhlFyqpjiQ
— Lokmat (@lokmat) July 6, 2022