Bhushi Dam: भुशी डॅम ओव्हरफ्लो! पायऱ्यांवरच्या पाण्याचा वेगही प्रचंड, पर्यटकांनी जाऊ नये - पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 12:34 PM2024-07-14T12:34:45+5:302024-07-14T12:36:54+5:30
जोरदार पावसामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याने डोंगर भागात जाणेही धोकादायक असू शकते
लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून प्रचंड वेगाने पाणी वहात असल्याने पर्यटकांनी सुरक्षेच्या कारणास्तव धरण परिसरात जाऊ नये असे आवाहन लोणावळापोलिसांनी केले आहे.
लोणावळा परिसरात काल शनिवार पासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले असून भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाच्या पायऱ्यांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यामध्ये जाऊन उभे रहाणे शक्य नसल्याने पर्यटक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ शकतात. आज सकाळी पोलीस प्रशासनाने भुशी धरण परिसरातील पाण्याच्या प्रवाहाची पाहणी करत पर्यटकांना धरण भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच जोरदार पावसामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले असल्याने त्यांच्या खाली थांबणे अथवा डोंगर भागात जाण्याचा प्रयत्न करणे हे धोकादायक ठरणारे असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी. तसेच धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन लोणावळा पोलीस व नगर परिषद प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे.
भुशी डॅम ओव्हरफ्लो! पायऱ्यांवरच्या पाण्याचा वेगही प्रचंड, पर्यटकांनी जाऊ नये - पोलिसांचे आवाहन (व्हिडिओ - विशाल विकारी)#pune#lonavala#Rain#bhushidampic.twitter.com/NeWEcSscl9
— Lokmat (@lokmat) July 14, 2024