Pune: अनैतिक संबंधात अडथळा ठरल्यानेच भुतांबरे यांचा खून; नारायणगावमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 20:54 IST2023-06-06T20:51:10+5:302023-06-06T20:54:00+5:30
नारायणगाव पोलिसांनी सविता भुतांबरे हिला अटक केली आहे...

Pune: अनैतिक संबंधात अडथळा ठरल्यानेच भुतांबरे यांचा खून; नारायणगावमधील घटना
नारायणगाव (पुणे) :नारायणगाव येथे खून झालेल्या साहेबराव नामदेव भुतांबरे यांच्या पत्नीचे आरोपीशी अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाला अटकाव होत असल्याने प्रेमी बंटी ऊर्फ प्रमिल गंगाराम खरमाळे याने प्रेमिका सविता भुतांबरे व मित्र यांना सोबत घेऊन खुनाचा कट करीत साहेबराव भुतांबरे यांची हत्या केली, असे तपासात निष्पन्न झाले. नारायणगाव पोलिसांनी सविता भुतांबरे हिला अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
प्रथमदर्शनी भुतांबरे यांचा खून आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून तसेच अनैतिक संबंधातून झाल्याचे दिसत होते. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर मृत साहेबराव भुतांबरे यांची पत्नी सविता साहेबराव भुतांबरे (वय ४० वर्षे) हिचे आरोपी बंटी ऊर्फ प्रमिल गंगाराम खरमाळे याच्यासोबत अनैतिक संबंध होते.
या संबंधात साहेबराव भुतांबरे यांचा अटकाव होत असल्याने यातील दोन्ही आरोपी व सविता भुतांबरे हिने कटकारस्थान करून भुतांबरे यांना ठार मारले, असे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या गुन्ह्यात भादंवि १२० ‘ब’ या कलमाची वाढ करून यातील आरोपी सविता साहेबराव भुतांबरे हिला अटक केली आहे.