बिबि नाव महसूल विभागातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:29+5:302020-12-05T04:14:29+5:30
चासकमान धरणात पाणी अडवण्यास सुरुवात १९९१ साली झाल्यानंतर बिबी ग्रामस्थ विस्थापित होऊन पुर्नवसन झाले बिबी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत बुरसेवाडी आणि ...
चासकमान धरणात पाणी अडवण्यास सुरुवात १९९१ साली झाल्यानंतर बिबी ग्रामस्थ विस्थापित होऊन पुर्नवसन झाले बिबी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत बुरसेवाडी आणि गुडांळवाडी या दोन वस्त्या वाडा रस्त्यावर आल्याने विस्तारल्या गेल्या बिबी ग्रामपंचायतीच्या नावाने आतापर्यत गुडांळवाडी पाच जागा आणि बुरसेवाडी चार जागा अशी ९ जागांवर निवडणुका होत होत्या. अखेर गुंडाळवाडी आणि बुरसेवाडी ही दोन महसुली गावे अस्तित्वात आल्यानंतर बिबी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे स्वंतत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांनी पाठपुरावा करुन उपसभापती भगवान पोखरकर,अंकुश राक्षे यांच्यामार्फत जिल्हा परीषदेकडे पाठवण्यात आल्या नंतर जिल्हा परीषद सदस्या तनुजाताई घनवट यांच्या शिफारसी नंतर नवीन बुरसेवाडी ग्रामपंचायत स्थापना करण्याची शिफारस पुणे जिल्हा परीषदेने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली होती. आता बिबी ग्रामपंचायत हे नाव जाऊन बुरसेवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्याने बुरसेवाडी, गुंडाळवाडी ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. बुरसेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी सरपंच सुरेश जैद,चंद्रकांत भोर,अरण गुडांळ, एल.बी.तनपुरे ,विलास जैद ,गणेश तनपुरे आदीनी पाठपुरावा प्रयत्न केले.