‘ट्रिंग ट्रिंग डे’तून सायकल वापराचा संदेश
By admin | Published: December 1, 2014 03:43 AM2014-12-01T03:43:03+5:302014-12-01T03:43:03+5:30
स्केटिंग, लगोरी, ढोल-लेझीमचे वादन, हास्यक्लब, योगासन, सूर्यनमस्कार, लाठी-काठी, दांडपट्टा, फरीगजगा, भालाफेक, लिंबू कापणे, बुद्धिबळासह विविध खेळात दंग झाले.
पिंपरी : स्केटिंग, लगोरी, ढोल-लेझीमचे वादन, हास्यक्लब, योगासन, सूर्यनमस्कार, लाठी-काठी, दांडपट्टा, फरीगजगा, भालाफेक, लिंबू कापणे, बुद्धिबळासह विविध खेळात दंग झाले. ओला कचरा विघटन प्रात्यक्षिके, डेंगी निर्मूलन व उपाययोजनेचे प्रात्यक्षिक आणि जनजागृती करीत ‘ट्रिंग ट्रिंग डे’ म्हणजेच ‘सायकल डे’ आज रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू, अधिकारी,
कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महापालिका, जनवानी
संस्था व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा उपक्रम होणार असल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.
या वेळी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, छाया साबळे, सुरेखा गव्हाणे, आरती चोंधे, माजी महापौर योगेश बहल, सहआयुक्त दिलीप गावडे, रवी पंडित, किरण कुलकर्णी, कर्नन समीर कुलकर्णी, इम्रान मुल्ला, पी. पी. पाटील यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालये विद्यार्थी, एन. सी. सी, एन. एस. एस.चे पथक, जर्मन सायकलपटू लुईस बारा, प्राईड ग्रुप, स्वयंसेवी संस्था व नागरिक प्रमाणावर सहभागी झाले होते. वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले.(प्रतिनिधी)