चार स्पर्धकांमुळे बोली सव्वादोन लाख रुपये

By admin | Published: March 28, 2017 02:15 AM2017-03-28T02:15:29+5:302017-03-28T02:15:29+5:30

पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाल्हे ग्रामपंचायतीचा बाजार लिलाव गेल्या वर्षीपेक्षा

Bid Sawvaston Lakhs Rs | चार स्पर्धकांमुळे बोली सव्वादोन लाख रुपये

चार स्पर्धकांमुळे बोली सव्वादोन लाख रुपये

Next

वाल्हे : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाल्हे ग्रामपंचायतीचा बाजार लिलाव गेल्या वर्षीपेक्षा ९५ हजारांनी जास्त गेला. दर वर्षीप्रमाणे मार्च महिन्यात बाजार लिलाव केला जातो.
त्याप्रमाणे यावर्षी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत बाजार लिलावाची बोली कमीत कमी दीड लाखाच्या पुढे ठेवण्यात आली. यामध्ये चार स्पर्धक असल्यामुळे बोली पार सव्वादोन लाखांपर्यंत गेली व राजाराम मुरलीधर राऊत यांनी तो लिलाव घेतला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बी. एस. गाताडे यांनी दिली.
या वेळी वाल्हे गावच्या सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपट नाना, सूर्यकांत पवार, चंद्रशेखर दुर्गाडे, दादा मदने, दीपक कुमठेकर, अंकुश दुर्गाडे, हनुमंत पवार आदी सदस्यांसहित ग्रामस्थ उपस्थित होते.
वाल्हे बाजारात परिसरातील बारावाडीतील लोक व पिगोरी, दोंडज, पिसुटी, मांडकी, हरणी परिसरातील शेतकरी बाजारासाठी आपला माल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे बाजार हा मोठा असतो.
तरीही बाजारकर लिलाव सव्वादोन लाखांवर गेल्यामुळे कर वाढविला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा व्यापारीवर्गात आहे.

Web Title: Bid Sawvaston Lakhs Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.