समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने बिडवई, वारे आणि विकास चव्हाण सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:46+5:302021-04-08T04:10:46+5:30

जितेंद्र बिडवई हे जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून हिरीरिने सक्रिय सहभाग घेत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विशेषतः शेती ...

Bidwai, Vare and Vikas Chavan honored on behalf of Samarth Educational Complex | समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने बिडवई, वारे आणि विकास चव्हाण सन्मानित

समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने बिडवई, वारे आणि विकास चव्हाण सन्मानित

Next

जितेंद्र बिडवई हे जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून हिरीरिने सक्रिय सहभाग घेत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विशेषतः शेती या क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत.गोळेगाव मध्ये द्राक्ष महोत्सवाच्या माध्यमातून सर्व द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम तसेच हार्वेस्टिंग करण्यापासून ते चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी ते सातत्यपूर्ण यशस्वी प्रयत्न करत असतात.विकास चव्हाण हे पारगाव या ठिकाणी ऊस शेती मध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करत उसाचे उत्पन्न प्रति एकरी कसे वाढवता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. त्याची दखल विविध संस्थांनी घेतलेली आहे..एकरी सव्वाशे टन एव्हढे उसाचे उत्पन्न घेणे ही तशी अवघड गोष्ट आहे. परंतु त्यामध्ये विकास चव्हाण यांनी मिळवलेले यश शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे असे उद्गार समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी काढले.शांताराम वारे यांनी देखील शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतानाच गोड्या पाण्यामध्ये खेकडा पालन हा शेतीपूरक व्यवसाय यशस्वीपणे समाजापुढे आणलेला आहे.व एका नवीन व्यवसायामध्ये यशस्वी पाऊल ठेवलेले आहे.त्याचबरोबर शेती मध्ये भरीव योगदान दिलेले आहे.आदिवासी गटातून राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झालेला आहे.या सर्वांना समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जी के औटी,बळीराम चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार वल्लभ शेळके यांनी मानले.

.

बेल्हायेथे समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने शेतकरी वर्गाचा सत्कार करताना मान्यवर

Web Title: Bidwai, Vare and Vikas Chavan honored on behalf of Samarth Educational Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.