Pune Police | पुणे पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १७ पिस्टलसह १३ जिवंत काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 09:12 PM2023-03-10T21:12:28+5:302023-03-10T21:14:53+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट ६ आणि १ च्या पथकांची कारवाई

Big action by Pune police As many as 17 pistols with 13 live cartridges seized | Pune Police | पुणे पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १७ पिस्टलसह १३ जिवंत काडतुसे जप्त

Pune Police | पुणे पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १७ पिस्टलसह १३ जिवंत काडतुसे जप्त

googlenewsNext

पुणे : गुन्हे शाखा युनिट सहा आणि युनिट एकच्या पथकाने दोन कारवाईत गावठी पिस्टल विक्री करणाऱ्या सात सराईत आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून २३ लाख ८१ हजार रुपये किमतीचे १७ गावठी बनावटीचे पिस्टल आणि १३ जिवंत काडतुसे, एक महिंद्रा कार आणि मोबाइल असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पुणे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

याप्रकरणी हनुमंत अशोक गोल्हार (२४, रा. जवळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), प्रदीप विष्णू गायकवाड (२५, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर, मू. रा. बीड), शुभम विश्वनाथ गर्जे (२५, रा. वडुले, ता. नेवासा, जि. अहमदनगर), अरविंद श्रीराम पोटफोडे (३८, रा. अमरापुरता, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), ऋषिकेश सुधाकर वाघ (२५, रा. सोनई, जि. अहमदनगर), अमोल भाऊसाहेब शिंदे (२५, रा. खडले परमानंद, ता. नेवासा, जि. अहमदनगर) आणि गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अटक केलेला साहील तुळशीराम चांदेरे ऊर्फ आतंक (२१, रा. वरची आळी, बालमित्र मंडळाजवळ, सुसगाव) अशी अटक केलेल्या सातही आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक पेट्रोलिंग करत असताना, २५ फेब्रुवारी रोजी पथकाला पिस्टल विक्री करणारे दोन डीलर वाघोली परिसरातील नानाश्री लॉज याठिकाणी आल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने सापळा रचून, आरोपी हनुमंत गोल्हार, प्रदीप गायकवाड यांना महिंद्रा कारसह अटक केली. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता, गाडीत एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यांनी विक्री करण्यासाठी या गोष्टी आणल्याचे सांगितल्याने त्यांच्यावर, लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता, हनुमंत गोल्हार हा नवी मुंबई येथील २ कोटी ८० लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणी वाँटेड असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अनधिकृत पिस्टल विक्री करणारे तसेच त्यांच्याकडून पिस्टल विकत घेणारे आरोपी अरविंद पोटफोडे, शुभम गर्जे, ऋषिकेश वाघ, अमोल शिंदे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून छापा मारत अटक केली. त्यांच्याकडून १३ गावठी बनवटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुसे आणि एक महिंद्रा कार, मोबाइल असा २१ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. युनिट १ च्या पथकाने देखील साहील चांदेरे ऊर्फ आतंक याच्या बॅगेतून ६० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि २ हजार रुपयांचे दोन जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Big action by Pune police As many as 17 pistols with 13 live cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.