...आणि नदीपात्रात झाला धमाका : वाळूउपसा करणाऱ्या  ३८ बोटींना जलसमाधी (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 02:47 PM2019-03-15T14:47:02+5:302019-03-15T14:57:20+5:30

महसूल पथकाने वाळूमाफियांचे हात चांगलेच आवळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरूच आहे. खानवटे (ता.दौंड), डिकसळ (ता. इंदापूर) आणि कात्रज (ता. करमाळा) येथील भीमा नदीपात्रात पहाटे साडेचार वाजता कारवाई केली.

a big blast at Bhigavan river bank : action against Sand Maphia by revenue department | ...आणि नदीपात्रात झाला धमाका : वाळूउपसा करणाऱ्या  ३८ बोटींना जलसमाधी (व्हिडीओ)

...आणि नदीपात्रात झाला धमाका : वाळूउपसा करणाऱ्या  ३८ बोटींना जलसमाधी (व्हिडीओ)

Next
ठळक मुद्देजिलेटिनच्या ३८ बोटीं साह्याने उद्ध्वस्तउजनी पाणलोट क्षेत्रात वाळूमाफियांवर कारवाई

पुणे :  महसूल पथकाने वाळूमाफियांचे हात चांगलेच आवळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरूच आहे. खानवटे (ता.दौंड), डिकसळ (ता. इंदापूर) आणि कात्रज (ता. करमाळा) येथील भीमा नदीपात्रात पहाटे साडेचार वाजता कारवाई केली. तीनही तालुक्यांच्या संयुक्त पथकाने दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तब्बल ३८ वाळूउपशाच्या फायबर बोटी जिलेटिनच्या साह्याने उडविण्यात आल्या. रात्री ८ वाजेपर्यंत कारवाई चालूच होती.

गुरुवारी (दि. १४)  उजनी पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळताच इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी  व करमाळ्याच्या तहसीलदारांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना घेऊन स्वत: पाण्यात उतरून दिवसभर धडक कारवाई केली. २६ वाळू उपसा करणाऱ्या  बोटी आढळून आल्या, त्यावर स्वत: तहसीलदार यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या  मदतीने जिलेटिनचा स्फोट करून बोटी उद्ध्वस्त केल्या.  

इंदापूरमधील तक्रारवाडी-डिकसळ येथे वाळूउपसा करून दौंड तालुक्यातील खानवटे आणि कात्रज गावात वाळू बाहेर काढणाऱ्या वाळूमाफियांवरील ही राज्यातील सर्वांत मोठी कारवाई आहे. कारवाईत दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी, सोनाली मेटकरी, सचिन आखाडे, निवासी नायब तहसीलदार यांच्यासह पोलीस केशव चौधर, अविनाश कांबळे यांनी कारवाई पथकात सहभाग घेतला होता.

पथकाची कुणकुण लागताच वाळूमाफिया साहित्य सोडून पसार

उजनी पाणलोट क्षेत्रात महसूल विभागाचा फौजफाटा घेऊन तहसीलदार येणार असल्याची खबर वाळूमाफियांना लागताच, वाळू उपसा करणारे चोरटे तहसीलदारांची गाडी पाहून पसार झाले.  त्यामुळे उजनीच्या नदीपात्रातील ज्या १३ फायबरच्या बोटी आणि १३ सेक्शन अशा २६ वाळूउपसा करणाऱ्या बोटी आढळून आल्या, त्यावर स्वत: तहसीलदारांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिलेटिनचा स्फोट करून त्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईमुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बोटी उद्ध्वस्त केल्याने वाळूमाफियांना बसला आहे. ही कारवाई इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावी सकाळपासून १० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे  तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले. 

Web Title: a big blast at Bhigavan river bank : action against Sand Maphia by revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.