सुशिक्षित बेरोजगार तरुण हे मोठे आव्हान, सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 04:15 AM2019-02-23T04:15:31+5:302019-02-23T04:15:50+5:30

भोर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या.

A big challenge for educated unemployed youth, Supriya Sule's interaction with the party workers | सुशिक्षित बेरोजगार तरुण हे मोठे आव्हान, सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

सुशिक्षित बेरोजगार तरुण हे मोठे आव्हान, सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

Next

भोर : बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वीज,पाणी व आरोग्यसेवा अशी बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. मात्र सुशिक्षित बेरोजगार तरुण हे मोठे आव्हान असून, त्यासाठी भविष्यात काम करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

भोर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी नगरसेवक यशवंत डाळ, नितीन धारणे व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना खा. सुळे म्हणाल्या, राज्यात आणि देशात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झााली असून, दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक प्रचार करणार आहेत. भोरमध्ये लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करुन आघाडीचा धर्म पाळतील तर विधानसभेला राष्ट्रवादीने आघाडीचे काम करावे म्हणून पुढाकार घेणार आहे. या वेळी खासदार सुळे यांनी केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री किसान योजनांसह विविध योजना व रेशनिंग दुकानात धान्याचा व रॉकेला तुटवडा यामुळे लोकांची सुरु असलेली परवड शासनाच्या चुकीच्या घेतलेल्या निर्णयाचा झालेल्या परिणामावर खरमरीत टीका केली.

केंद्र सरकारक डून अपंग लोकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे साहित्याचे वाटप केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्यसेवा ही कामे मार्र्गी लागली आहेत. मात्र शासकीय नोकऱ्या आणी खासगी कंपनीतील कामाच्या अभावामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण हे मोठे आव्हान असून, भविष्यात त्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- सुप्रिया सुळे, खासदार
 

Web Title: A big challenge for educated unemployed youth, Supriya Sule's interaction with the party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.