पाणथळांना नवसंजीवनी देण्याचे मोठे आव्हान
By admin | Published: February 3, 2016 01:38 AM2016-02-03T01:38:46+5:302016-02-03T01:38:46+5:30
पाणथळांचे महत्त्व जसे मानवी जीवनात आहे; तसेच वन्य जीवनातही. ते अधिकाधिक चांगले राहावे, यासाठी जंगलांमधील व शहरांतील पाणथळांमध्ये साठलेला गाळ उपसणे
भीमाशंकर : पाणथळांचे महत्त्व जसे मानवी जीवनात आहे; तसेच वन्य जीवनातही. ते अधिकाधिक चांगले राहावे, यासाठी जंगलांमधील व शहरांतील पाणथळांमध्ये साठलेला गाळ उपसणे, यावर झालेली अतिक्रमणे दूर करणे, येथे कचरा टाकणे बंद करणे, भराव करून नामशेष झालेली पाणथळे पुन्हा तयार करणे हे काम हाती घेणे महत्त्वाचे आहे. या पाणथळांना नवसंजीवनी देण्याचेच मोठे आव्हान आहे.
पाणथळ प्रदेशांचे मानवी जिवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने २ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतीक वेटलँड्स डे’ म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. भारतामध्ये अष्टमुडी (केरळ), भीतरकणिका (ओरिसा), भोज (मध्यप्रदेश), चंद्रताल (हिमाचल प्रदेश), हरिके (पंजाब), केवलादेव (राजस्थान) तर महाराष्टात जायकवाडी (औरंगाबाद), शिवडी, उरण (मुंबई) नांदुर मध्यमेश्वर (नाशिक), उजनी (पुणे), नवेगाव बांध (नवेगाव), लोणार (बुलढाणा) अशी प्रसिध्द पाणथळींची ठिकाणे आहेत. भारतात येणारे सर्व प्रकारे परदेशी पक्षी अशा पाणथळांच्या जागेवरच आपले वास्तव्य करतात, चिखला व उथळ पाण्यामध्ये असतात. उजनी धरणाच्या काठी भिगवण जवळ मोठया प्रमाणात परदेशी पक्षी दिसतात कारण हि जागा पाणथळांची जागा आहे. मात्र या पाणथळांचेच अस्तित्व माणसाने धोक्यात आणल्याने पक्ष्यांच्या स्थलांतरावरही परिणाम होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.