MPSC चा मोठा निर्णय! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:15 IST2022-06-24T18:06:06+5:302022-06-24T18:15:02+5:30
आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध

MPSC चा मोठा निर्णय! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल
पुणे : आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजेच लेखी करण्याचा महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ही परीक्षा योजना 2023 मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असेल. काही दिवसांपूर्वीच राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी केला होता. सदर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून करण्यात येत आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू असेल.
आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/fTh3slTGBm
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 24, 2022
पुढील काही दिवसांत राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.
सुधारित परीक्षायोजना व अभ्यासक्रमामुळे अधिकाअधिक गुणवत्ताधारक उमेदवार उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे.
-सुनिल अवताडे (सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)